Mansoor Ali Khan- Trisha Krishnan Derogatory Comment Row  Esakal
मनोरंजन

Trisha Krishnan Row: 'माणूस चुका करतो कारण...' मन्सूर खानच्या माफीनाम्यानंतर त्रिशाची पहिली प्रतिक्रिया

मन्सूर अली खानने त्रिशाची माफी मागितली होती, त्यानंतर आता तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Vaishali Patil

Trisha Krishnan Reacts To Mansoor Ali Khan's Apology: गेल्या काही दिवसांपासून साऊथ अभिनेत्री त्रिशा कृष्णन ही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिचा आणि साऊथ स्टार विजयचा लिओ हा सिनेमा रिलिज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

मात्र त्रिशा या चित्रपटामुळे नाही तर तिच्यावर एका अभिनेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि मन्सूर अली खान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे.

मन्सूर अली खानने त्रिशावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक कलाकारांनी त्याच्यावर टीका केली आणि माफी मागण्याची विनंती देखील केली. मात्र मन्सूर अली खानने पुन्हा एक बेताल वक्तव्य केलं आणि तो माफी मागणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला.

याप्रकरणी पोलिसांनी मन्सूरवरही कारवाई केली होती. त्यानंतर काल एक पोस्ट शेअर करत मन्सूरने त्रिशाची माफी मागितली. आता मन्सूरने मागितलेल्या माफीनंतर त्रिशाने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

त्रिशा कृष्णनने ट्विटरवर मन्सूर अली खानच्या माफीबद्दल प्रतिक्रिया देणारी एक पोस्ट शेअर केली, ज्यात तिने लिहिले आहे- 'चुका करणं हा मानवी स्वभाव आहे आणि क्षमा करणे हा देवतांचा गुण आहे.' सध्या त्रिशा कृष्णनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

तमिळ चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मन्सूरनं काही दिवसांपुर्वी सांगितलं होतं की, 'लिओ' चित्रपटात त्रिशा कृष्णनसोबत कोणताही सीन केला नाही म्हणुन त्याला वाईट वाटले. त्याला वाटलं होतं, त्रिशासोबत त्याचा बेडरूम सीन असेल जिथे तो तिच्यासोबत बलात्काराचा सीन शुट करेल असं वक्तव्य मन्सूरने केल्यानंतर त्रिशाने इंस्टाग्रामवर नोट लिहत मन्सूर अलीसोबत पुन्हा काम करणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर बराच वादही झाला.

मात्र नंतर मन्सूरचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच त्याने एक पोस्ट शेअर करत त्रिशा कृष्णनची माफी मागितली होती. आता त्रिशाने त्याला माफ केल्यानंतर हे प्रकरण मिटलं असल्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT