Tunisha Sharma Esakal
मनोरंजन

Tunisha Sharma: पोस्टमॉर्टमनंतर तुनिषाच्या अंत्यसंस्कारबाबत मोठी अपडेट..

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं 'अली बाबा : दास्ताँ-ए-काबूल' या सिरियलच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षीच तुनिषानं जगाचा निरोप घेतला.

मुंबईतील जेजे रुग्णालयात आज तिचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यांनतर आज संध्याकाळी 4 वाजता मुंबईतील मीरा रोड येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते मात्र आता तिच्या अंत्यसंस्कारबाबत एक माहिती समोर आली आहे .

तुनिषा शर्माच्या निधनानंतर आज अंत्यसंस्कार होणार होतं, पण आता बातम्या येत आहेत की तुनिषाचं अंतिम संस्कार आज म्हणजेच 25 डिसेंबर 2022 रोजी होणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषाचा मृतदेह आज सकाळी कुटुंबीयांना देण्यात येणार होता आणि त्यानंतर संध्याकाळी 4 ते 4.30 या वेळेत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, मात्र आज तिच्यावर अंतिम संस्कार होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

चंदीगडहून तुनिषाचे काही नातेवाईक येणे बाकी असल्याने तिच्यावर 26 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळतं असली तरी खरं कारण अद्याप स्पष्ट नाही

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. यामध्ये डॉक्टरांच्या टीमने प्रामुख्याने अभिनेत्रीचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे सांगितले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या अहवालावर कोणतेही जाहीर वक्तव्य केलेले नाही. पण तुनिषाच्या गरोदरपणाची बातमी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

SCROLL FOR NEXT