Debina Bonnerji esakal
मनोरंजन

Viral News: देबीना बॅनर्जी - गुरमीतच्या घरी 'नवी पाहुणी'

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerji) ही तिच्या स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखली जाते.

युगंधर ताजणे

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerji) ही तिच्या स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचा मोठा फॅन फॉलोअर्स आहे. आता देबीना आणि गुरमतीनं गुड न्युज दिली आहे. काल प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियानं (Bharti Singh and harsh limbachiya) गोड बातमी देऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर देबीनानं मुलीला जन्म दिल्याची बातमी व्हायरल झाली आहे. तिच्या घरी नवी पाहुणी आल्यानं चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावरुन देबीनाला नेटकऱ्यांनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. त्या दोन्ही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेयर केला असून त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

गुरमीत चौधरीनं जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यामध्ये त्यानं लिहिलं आहे की, आज आम्ही खुप आनंदी आहोत. त्याचे कारण आमच्या घरी नवी पाहुणी आली आहे. आम्ही त्या पाहुणीचं मनापासून स्वागत करतो. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करतो. आपण दिलेल्या प्रेमानं आम्ही भारावून गेलो आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी मुलीच्या हाताचा फोटो शेयर करुन चाहत्यांना गो़ड बातमी दिली आहे. प्रेग्नंसीच्या काळातही देबीना ही सोशल मीडियावर सक्रिय होती. यावेळी तिचे वेगवेगळ्या पोस्टही चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजन विश्वातील गुड न्युज समोर येत असल्याचे पाहून चाहत्यांनी आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेग्नंसीच्या दरम्या देबीनाला काही जणांनी ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला होता. याप्रसंगी तिनं आपण मानसिक आणि शाररिकरित्या खंबीर असल्याचे सांगितले होते. प्रेग्नंसीच्या काळात महिलांनी त्यांचं मानसिक आरोग्य संतुलित ठेवणं गरजेचं असतं. अशावेळी तिनं काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी लागते. अशा आशयाच्या पोस्ट देबीनानं सोशल मीडियावर शेयर केल्या होत्या. मी तर या काळात योगा करण्यावर भर दिला होता हेही सांगण्यास देबीना विसरली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT