Urfi Javed google
मनोरंजन

Urfi Javed: अंडरवियरवरून केला जोक, उर्फी चित्रा वाघांना म्हणाली ग्रेट

दिवसेंदिवस भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यातील वाद चिघळत चालला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद चर्चेत आली आहे. दिवसेंदिवस भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. दरम्यान, आता उर्फीने स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. (Urfi Javed Chitra Wagh controversy Great New Tweet )

उर्फी ट्विटरवरून सातत्याने चित्रा वाघ यांना डिवचत आहे. ती फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये चित्रा वाघ यांचा उल्लेख करताना दिसून येत आहे. दरम्यान, तिनं स्वतःच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख केल्याने तिचे ट्विट सध्या चर्चेत आले आहे.

Urfi Javed: 'म्हणूनच मी पूर्ण कपडे घालत नाही', शेवटी ऊर्फीनं सांगितलं कारण

काय म्हणाली उर्फी?

काल रात्री साडेनऊच्या सुमरास उर्फीने ट्विट केले आहे. त्यामध्ये तिनं “उर्फी की अंडविअर मे छेद है, चित्रा ताई ग्रेट है,” असं म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर तिने तीन रेड हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत.

यापूर्वी मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं उर्फीने म्हटलं होतं.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक वाद थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. उर्फी जावेद खूपच तोकडे कपडे घालते, त्यामुळे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली होती. यासंदर्भात पत्रही त्यांनी मुंबई पोलिसांना दिलं होतं. तसेच उर्फीचं थोबाड फोडण्याचं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्त्तव्यांना उर्फीही सडेतोड उत्तर देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: कोणालाच विश्वास बसणार नाही! फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात असं घडलं… इतिहास बदलणारा निर्णय?

Latest Marathi News Live Update: फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का कारवाई

Lord Jagannath: भगवान जगन्नाथाला इंग्रज का घाबरायचे? दोन अधिकाऱ्यांना बसला होता मोठा धक्का

शिक्षण, नोकरी, लग्न, घर सगळं झालं... पण मला आवडतं तेच राहिलं; तरुणीने ३० लाख पॅकेजचा जॉब सोडला

Teachers in Election Work : निवडणूक कामकाजात अडकले शिक्षक! वर्गावर शिकवायचे कधी? शिक्षकांविना विद्यार्थी सुरक्षा धोक्यात

SCROLL FOR NEXT