Ved Movie Box Office Collection  esakal
मनोरंजन

Ved Movie Box Office Collection : सैराटचा विक्रम मोडला! सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये...

मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर हिट करणाऱ्या रितेश देशमुखच्या वेड चित्रपटानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ved Marathi Movie Box office collection Riteish Deshmukh : मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर हिट करणाऱ्या रितेश देशमुखच्या वेड चित्रपटानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या चित्रपटानं प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सैराट या विक्रम मोडीत काढला आहे. आणि आपल्या नावावर एक वेगळा विक्रम केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील थिएटरमध्ये रितेश देशमुखच्या वेडची हवा आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबदस्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. भलेही वेड हा टॉलीवूडच्या चित्रपटावर आधारित असला तरी त्याचा मराठी रिमेक प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळेच की काय सध्या सगळीकडे थिएटरमध्ये वेडचं वेडं पाहायला मिळते आहे.

Also Read - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

रितेश देशमुख, जेनेलिया, अशोक सराफ अशी मोठी स्टारकास्ट असलेल्या वेडला अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. त्यातील गाणी ही सर्वाधिक लोकप्रिय झाली आहेत. नव्या वर्षात रितेशच्या वेड चित्रपटानं केलेली कामगिरी कौतूकास्पद आहे. त्यानं सोशल मीडियावर देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन प्रभावी ठरताना दिसते आहे. आता सर्वात जास्त कमाई करणारा ‘सैराट’ पाठोपाठ ‘वेड’ हा दुसरा चित्रपट म्हणून समोर आला आहे.

रितेशच्या वेड चित्रपटानं त्याच्याच काही चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्यात लय भारी चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींची कमाई केली असून आता लवकरच हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. सैराटनं एकाच दिवशी जी विक्रमी केली होती तो विक्रम आता वेडनं मोडला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे.

तरण आदर्श जे चित्रपट समीक्षक म्हणून ओळखले जातात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये आणखी मोठी कमाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजुन काही विक्रम हे वेडच्या नावावर जमा होणार आहेत. असे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT