Viral Video: Ranveer Singh touch nana patekar feet and planted a kiss on his cheek. Instagram
मनोरंजन

Ranveer Singh: मंचावर लहान मुलाप्रमाणे धावत सुटला रणवीर, नानांचे धरले पाय अन् गालावर केलं किस

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंगला त्याच्या '८३' सिनेमातील भूमिकेसाठी गौरविण्यात आलं आहे.

प्रणाली मोरे

Viral Video: मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंग उपस्थित राहिला होता, या पुरस्कार सोहळ्यातला एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे,ज्यात रणवीर सिंग स्टेजवर पळत पळत जातो आणि बड्या दिग्गजांच्या मध्ये उभ्या असलेल्या अभिनेते नाना पाटेकरांची गळाभेट घेताना दिसत आहे. याव्यतिरिक्त रणवीरचा आणखी एक व्हिडीओ चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरत आहे तो म्हणजे ज्यात तो आपला प्रसिद्ध सिनेमा बाजीराव-मस्तानी मधील गाणं गाताना दिसत आहे.(Viral Video: Ranveer Singh touch nana patekar feet and planted a kiss on his cheek.)

रणवीर सिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यापुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंगच्या ८३ सिनेमाला पुरस्कारानं गौरविण्यात आलं. ८३ सिनेमात क्रिकेटर कपिल देवआणि त्यांच्या भारतीय क्रिकेट टीमनं जिंकलेल्या वर्ल्ड कपवर आधारित कहाणी पहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहतो की रणवीर सिंगच्या सिनेमाला जसं पुरस्कार मिळाल्याची घोषणा होते तसं तो तडक उठून उभा राहतो आणि आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये पुरस्काराचा आनंद व्यक्त करतो आणि स्टेजच्या दिशेने धावू लागतो.

स्टेजवर खूप बडे-बडे दिग्गज उपस्थित दिसत आहेत. त्यांच्यामध्ये बॉलीवूड अभिनेते नाना पाटेकरही उभे दिसत आहेत. रणवीर स्टेजवर पोहोचल्यावर इकडे-तिकडे कुणाकडेही पहात नाही आणि थेट नाना पाटेकरांना जाऊन घट्ट मिठी मारतो आणि नंतर त्यांच्या गालाला किस करतो. आणि मग नंतर तो पुरस्काराचा स्विकार करायला जाताना दिसतो रणवीरचं हे वागणं पाहून त्याचे चाहते मात्र भलतेच खूश झालेयत. त्याचं हे वागणं लोकांना खूपच आवडलं आहे.

रणवीरचा आणखी एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे,ज्यात तो आपल्या 'बाजीराव-मस्तानी' सिनेमातील प्रसिद्ध गाणं 'बजने दे धडक-धडक' गाण्यावर धमाल करताना दिसतो.

रणवीरच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर लवकरच तो रोहित शेट्टीच्या 'सर्कस' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात रणवीरसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे देखील आहे. त्याव्यतिरिक्त 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या करण जोहर दिग्दर्शित सिनेमातही तो दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्ट देखील आहे. तसंच,धर्मेंद्र,जया बच्चन,शबाना आझमी देखील सिनेमात दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT