Vishakha Subhedar trollled for her new serial shubhvivah on star pravah sakal
मनोरंजन

Vishakha Subhedar: मालिका सुरू होण्याआधीच विशाखा सुभेदार ट्रोल! तिनंही दिलं सडेतोड उत्तर..

'हास्यजत्रा' सोडल्यानंतर बऱ्याच काळाने अभिनेत्री विशाखा सुभेदार नव्या मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे.

नीलेश अडसूळ

vishakha subhedar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला रामराम केल्यानंतर विनोदाची राणी अभिनेत्री विशाखा सुभेदार जवळपास वर्षभराने पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण करत आहे. 'स्टार प्रवाह' वरील 'शुभविवाह' या मालिकेतील ती आत्याबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. पण ही मालिका सुरू होण्या आधीच काही ट्रोलर्सने विशाखाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ऐकून घेईल ती विशाखा कसली.. तिनेही त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे.

(Vishakha Subhedar trollled for her new serial shubhvivah on star pravah)

विशाखाने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अनेक वर्ष महाराष्ट्राचे मनोरंजन केले. मध्यंतरी तिने 'हास्यजत्रा'ला निरोप दिला. काहीतरी नवीन करू पाहण्यासाठी तिने हा ब्रेक घेतला होता. अखेर तो क्षण तिच्या आयुष्यात आला आहे. 'शुभविवाह' या मालिकेतून ती वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो शेयर करत 'तुमच्या आशीर्वादाने,पुन्हा एकदा मालिकेच्या जगात,एका वेगळ्या भूमिकेत.. मायबाप प्रेक्षक..प्रेम राहू दया' असे आवाहन प्रेक्षकांना केले होते. पण झाले उलटेच. प्रेक्षकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे

विशाखा सुभेदारच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. 'कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांचा आदर आहे, परंतू आता काहीतरी नवीन हवं', असे त्याने यात म्हटले आहे. त्यावर विशाखानेही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. 'जसं बुलेट ट्रेननंतर जत्रा नवं होतं अगदी तसंच… हे माझं नवीन काम आहे… आणि आधी नीट तर सुरु होऊ दे. बघा आणि मग नकारात्मक कमेंट करा,' अशा शब्दात विशाखाने या कमेंटचा समाचार घेतला आहे.

या मालिकेत विशाखा सुभेदार आत्याबाईच्या भूमिकेत दिसणार आहे तर मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र, विजय पटवर्धन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. दोन सावत्र बहीणींची ही गोष्ट आहे. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट यात दाखवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

Anna Hazare : लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर संवादातून प्रश्न सोडवावेत; अण्णा हजारे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Delhi Police: 'ते' साध्या वेशातील लोक खरंच पोलिस होते का? दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी काढले कडक आदेश

Mumbai Local : कसारा मार्गावरील गर्दीला अखेर दिलासा; सप्टेंबरपासून १५ डब्यांच्या लोकलचा होणार विस्तार

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

SCROLL FOR NEXT