Who is Radha Rama Mannar in salaar Know interesting facts about the Sriya Reddy SAKAL
मनोरंजन

Who is Radha Rama Mannar: प्रभासच्या 'सालार'मधली 'राधा रमा मन्नार' नक्की कोण? जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल रंजक गोष्टी

प्रभासच्या सालारमध्ये दहशत पसरवणाऱ्या राधा रमा मन्नारबद्दल जाणून घ्या

Devendra Jadhav

Who is Radha Rama Mannar Siya Reddy: KGF फेम दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार : पार्ट 1 - सीझफायर' या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ केलाय.

प्रभास स्टारर 'सलार' या चित्रपटाने दोनच दिवसात १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. या चित्रपटात प्रभासपेक्षा एका अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतलं. ती म्हणजे सिनेमात राधा रमा मन्नारची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रीया रेड्डी. कोण आहे श्रिया जाणून घ्या?

श्रियाची सिनेमातली भूमिका

सालार चित्रपटाची कथा देवा (प्रभास) आणि वर्धा (पृथ्वीराज सुकुमारन) या दोन मित्रांभोवती फिरते. चित्रपटात उत्कृष्ट अॅक्शन सीन्स आहेत, याशिवाय काही भावनिक प्रसंगही पाहायला मिळतील.

सालारमध्ये खानसार नावाचं साम्राज्य आहे. या साम्राज्यात दहशत आहे ती राधा रमा मन्नारची. राधा जे म्हणेल ती पुर्वदिशा, असं खानसारची जनता मानते. खानसारवर कब्जा मिळवण्यासाठी राधा वाट्टेल त्या थराला जाते. राधाची जबरदस्त भूमिका श्रियाने साकारली आहे.

कोण आहे श्रिया रेड्डी?

2002 मध्ये तमिळ चित्रपट 'समुराई'मध्ये विशेष भूमिकेतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रिया रेड्डीने 'ब्लॅक', 'थिमिरू' आणि 'कांचीवरम' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

श्रियाने टेलिव्हिजन प्रेझेंटर आणि व्हिडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे. ती माजी भारतीय क्रिकेटपटू भरत रेड्डी यांची मुलगी आहे. तिचे पती विक्रम कृष्णा हे देखील तमिळ चित्रपटांचे निर्माता आणि अभिनेते आहेत.

विक्रम कृष्णा हा दाक्षिणात्य अभिनेता विशालचा भाऊ आहे. त्यामुळे नात्याने श्रिया विशालची वहिनी आहे.

सालारविषयी थोडंसं...

'सालार' या पॅन इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सिनेमात राधा रम्मा मन्नारच्या भूमिकेत श्रिया रेड्डीच्या अभिनयाचं खुप कौतुक होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT