Bonda Mani Death News: प्रसिद्ध हास्यकलाकार बोंडा मणींचे दुःखद निधन

हास्यकलाकार बोंडा मणी यांनी विविध सिनेमांमधून साकारलेल्या भूमिका लोकप्रिय झाल्या
Famous comedian actor Bonda Mani passed away at the age of 60
Famous comedian actor Bonda Mani passed away at the age of 60SAKAL
Updated on

Bonda Mani Death News: भारतीय मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता बोंडा मणी यांचे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते.

23 डिसेंबर रोजी किडनीशी संबंधित आजारामुळे मणी पोझिचलूर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या होत्या.

Famous comedian actor Bonda Mani passed away at the age of 60
Shruti Sinha: श्रुतीचे छोटे कपडे पाहून शिक्षकांनी टोकलं, तर संतापत अभिनेत्री निघाली कॉलेजबाहेर! वाचा सविस्तर

किडनीच्या आजारामुळे बोंडा मणी यांचे निधन

23 डिसेंबरच्या रात्री, मणी चेन्नईच्या पोझिचलूर येथील त्यांच्या निवासस्थानी बोंडा मणी बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना क्रोमपेट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांचे पार्थिव पोळीचलूर येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर क्रोमपेट येथील स्मशानभूमीत सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी मालती, मुलगा - मुलगी असा परिवार आहे.

यापूर्वी 2022 मध्ये धनुष आणि विजय सेथुपती यांनी बोंडा मणीच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये दिले होते. बोंडा मणी ज्यांच्यासोबत अनेक वर्षे काम करत होते, त्या वडिवेलू यांनीही त्यांना उपचारासाठी आर्थिक मदत केली होती.

बोंडा मणी हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेता होते. वयाच्या ६० व्या वर्षीही ते मनोरंजन विश्वात सक्रीय होते. बोंडा मणी यांनी आघाडीच्या अभिनेत्यांसोबत असंख्य तमिळ चित्रपटांमध्ये काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com