why shah rukh khan never go to kashmir emotional reason behind his father srk birthday SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan Birthday: जग फिरणारा शाहरुख आजवर काश्मिरला का नाही गेला? कारण ऐकून व्हाल भावुक

शाहरुखने एका मुलाखतीत तो काश्मिरला कधीच नाही गेला याचं भावुक कारण सांगितलं आहे

Devendra Jadhav

Shah Rukh Khan Birthday News: आज शाहरुख खानचा वाढदिवस. शाहरुख खानच्या वाढदिवसाला जगभरातले हजारो, लाखो फॅन्स त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शाहरुख खान ५८ वर्षांचा झाला आहे.

शाहरुख खानने आजवर त्याच्या सिनेमांच्या माध्यमातुन भारतात - परदेशात भ्रमंती केली आहे. पण तो कधीच भारतातील काश्मिरला गेला नाही. काय आहे यामागचं कारण? जाणुन घ्या.

(why shah rukh khan never go to kashmir emotional reason behind his father srk birthday)

शाहरुख खान कधीच काश्मिरला गेला नाही, हे आहे कारण

शाहरुखची एक जुन्या मुलाखतीत शाहरुखने हे कारण सांगितलं आहे. SRK अमिताभ बच्चन यांच्या KBC शोमध्ये गेला होता तेव्हा तो म्हणाला,"माझ्या वडिलांची आई काश्मिरी होती. म्हणून एकदा वडिलांनी मला सांगितले की, आयुष्यात एकदा तरी या तीन ठिकाणांना भेट दिली पाहिजे. इस्तंबूल, रोम आणि काश्मीर.

शाहरुखचे बाबा त्याला म्हणाले होते, "रोम, इस्तंबुल ये दो जगह मेरे बिना लेना पर काश्मीर मेरे बिना मत देखना". (रोम, इस्तंबुल तु फिर पण काश्मिर माझ्याशिवाय फिरु नको. मी दाखवेल)

शाहरुख पुढे म्हणाला, "माझे बाबा खुप लवकर जग सोडून गेले. पुढे कामानिमित्त मी जगभर पोहोचलो. पण मी कधीच काश्मीरला गेलो नाही. मला अनेक संधी मिळाल्या... मित्रांनी बोलावले, कुटुंबातील सदस्य सुट्टीवर गेले... पण मी कधीच काश्मीरला गेलो नाही कारण माझे वडील म्हणाले होते, 'काश्मीर मेरे बिना मत देखना... मै दिखाऊंगा...'

शाहरुख खानचा हा भावनिक व्हिडिओ सर्वांचं मन जिंकत आहे. दरम्यान 'जब तक है जान'च्या शूटिंगदरम्यान शाहरुखने काश्मीरला भेट दिली होती असं अनेक लोकं सांगत आहेत.

त्यावेळी शाहरूख म्हणाला होता की, यश चोप्रा त्याच्यासाठी वडिलांसारखे आहेत आणि म्हणून तो त्यांच्यासोबत काश्मीरला गेला होता. एकुणच शुटींगनिमित्ताने शाहरुख काश्मिरला गेलाय पण वडिलांनी दिलेला शब्द असल्याने तो काश्मीरला कधीही फिरायला नाही गेलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहली भारत सोडून लंडनमध्ये का राहतो?; RCB स्टारच्या सहकाऱ्याने सांगितलं कारण म्हणाला त्याला...

कोकणात 'या' ठिकाणी झालंय सई ताम्हणकरच्या 'तुंबाडची मंजुळा'चं शूटिंग; कलाकारांनीच सांगितलं गावाचं नाव

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फूस लावून अल्पवयीन मुलीचं अपहरण, नंतर अत्याचार अन्...; कसा लागला शोध?

Headmaster Bribery Case : नांदेडमध्ये खळबळ! बदली करण्यासाठी लिपिकाकडे मागितली 50 हजारांची लाच; मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात, अंगझडतीत काय काय सापडलं?

Jamun Benefits : हंगामातील छोटं फळ, पण फायदे मोठे! जांभळाच्या सेवनाने मधुमेह ते वजन राहू शकते नियंत्रणात; बाजारात 300 रुपये किलोने विक्री

SCROLL FOR NEXT