amitabh-abhishek-aishwarya.amitabh-abhishek-aishwarya. 
मनोरंजन

जगप्रसिद्ध रेसलर जॉन सीनाने केली बच्चन कुटुंबीयांसाठी प्रार्थना..

संतोष भिंगार्डे

मुंबई : डब्ल्यूडब्ल्यूईचे जगप्रसिद्ध रेसलर तसेच अवघ्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या जॉन सीना याने बच्चन कुटुंबियांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या सोबत आहेत, असे त्याने सांगितले आहे.

जेव्हा जॉनला कळले की अमिताभ व अभिषेक यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याने सोशल मीडियावर दोघांचेही फोटो शेअर केले आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ऐश्वर्यादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तेव्हा जॉनने पुन्हा ऐश्वर्या राय-बच्चन यांचे फोटो शेअर केला आहे. बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर घरी परतावे याकरिता त्याने प्रार्थना केली आहे.

जॉनचे भारताबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्याने अनेकदा भारतात भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे जेव्हा तो मुंबईत येतो तेव्हा त्याचे मुंबईतील अत्यंत खास आणि जवळच्या उच्च वर्गातील व्यक्तींशी भेटीगाठी होत असतात. 
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Crime: शिक्षकच ठरला भक्षक! विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून अत्याचार; जालन्यात शिक्षक अटकेत, शिक्षणाच्या मंदिरातच घडला संतापजनक प्रकार

Jowar Price Hike : भाकरी महागली... ज्वारी 50 पार; बार्शीच्या शाळू ज्वारीने गाठला प्रतिकिलो 80 रुपयांचा दर

दोन सहकारी अन् मित्राच्या त्रासाला कंटाळून TCS मधील आयटी अभियंत्यानं संपवलं जीवन, चिठ्ठीत गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : माजलगावात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद

Mumbai Local: सीटच्या वादातून रक्तरंजित हल्ला; प्रवाशाच्या पोटात चाकू खुपसला, मुंबई लोकलमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT