esakal | अॅण्ड्रॉईड मोबाईलधारकांनो सावधान! हॅकर्सनी विकसित केला मालवेअर...
sakal

बोलून बातमी शोधा

mobile hack

कोरोना संकटामुळे फेक मेसेजस मोठा पूर समाज माध्यमांवर आला आहे. त्याला आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासन कसोशीने प्रयत्न करत असताना आता मालवेअरचे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यासाठी वेळीच पोलिसांनी नागरिकांना सावध केले आहे.

अॅण्ड्रॉईड मोबाईलधारकांनो सावधान! हॅकर्सनी विकसित केला मालवेअर...

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु केला असतानाच यादरम्यान सायबर गुन्हेगारांनी अॅण्ड्रॉईड मोबाइल वापरणाऱ्यांना लक्ष्य करण्यात सुरूवात केली आहे. त्यासाठी हॅकर्सनी अॅण्ड्रॉईड मालवेअर विकसित केले असून हे मोबाइलमध्ये डाऊनलोड झाल्यास सर्व डेटा लीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रसिद्धी प्रमुख आर. आर. पाठक यांचे निधन

कोरोना संकटामुळे फेक मेसेजस मोठा पूर समाज माध्यमांवर आला आहे. त्याला आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासन कसोशीने प्रयत्न करत असताना आता मालवेअरचे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यासाठी वेळीच पोलिसांनी नागरिकांना सावध केले आहे.

रानभाज्या विक्रीच्या हंगामाला लॉकडॉऊनचा फटका; अदिवासी बांधवांची होतेय उपासमार

दरम्यान, कोरोनाच्या संकटात राज्यात काही गुन्हेगार आणि समाजकंटक या स्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या गुन्हेगार तसेच समाजकंटकांवर कठोर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर सर्व आयुक्त तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून याविरोधात धडक मोहीम राबवत आहे. त्यात प्रामुख्याने फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर करडी नजर ठेवण्यात येत असल्याचे सायबर पोलिसांनी नमूद केले आहे.

गटारी असूनही मटनाच्या विक्रीत मोठी घट वाचा 'हे' आहे कारण...

आक्षेपार्ह पोस्ट, मेसेज 546 गुन्हे दाखल
लॉकडाऊनच्या काळात 17 जुलैपर्यंत राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत 546 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी सर्वाधिक 230 गुन्ह्यांची नोंद झाली आहे तर आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड केल्याप्रकरणी 206 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी 28, आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 18 गुन्हे, इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट अपलोडप्रकरणी 4 गुन्हे तर अन्य सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांत 287 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

चित्रपट दिग्दर्शक रजत मुखर्जीं यांचे जयपूरमध्ये निधन....

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

  • फक्त अधिकृत मोबाइल अॅप डाऊनलोड करा.
  • शक्यतो गुगल प्ले स्टोअरमधूनच मोबाईल अॅप डाउनलोड करा.
  • कुठल्याही मोबाइल बँकिंग अॅपमध्ये ऑटो लॉगइनचा पर्याय वापरू नका.
  • केंद्र तसेच राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करते, त्याचे पालन करावे.

---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image