Armaan Malik Chain Snatching: Esakal
मनोरंजन

Armaan Malik: प्रसिद्ध यूट्यूबवर चोरट्याचा हल्ला! 11 तोळ्याची चैन घेवुन बदमाश फरार..

Vaishali Patil

Armaan Malik Chain Snatching: प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक हा सोशल मिडियावरील चर्चेतलं नाव आहे. तो नेहमीच कोणत्याना ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तो त्याच्या दोन बायका आणि चार मुलांसोबत राहतो. वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक जीवन त्याची चर्चा होतच असते.

काही दिवसांपुर्वीच त्याच्या घरी तीन चिमूकल्यांच आगमन झालं आहे. त्याच्या दोन्ही पत्नींनी गोंडस मुलांना जन्म दिला आहे. मात्र या आनंदानंतर त्याच्या घरावर गेली काही दिवसांपासून अनेक संकटे येत आहे. आधी मुलाची तब्येत बिघडली आणि आता अरमान मलिकवर हल्ला झाला आहे.

अरमानने याचा व्हिडिओ त्याच्या सोशल मिडिया अकाउंटला शेअर केला आहे. ज्यात त्याने ही माहिती दिली आहे. नवीन व्हिडिओद्वारे दोन मुलांनी त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी कशी खेचली हे त्याने सांगितलं आहे.

अरमान मलिकने त्याच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये सांगितले की, 'पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन मुलांनी त्याचा कारचा आरसा उघडला. पोरांनी अरमानला विचारलं की भावा इथं मॉल वगैरे आहे. अरमानने त्यांना सांगितले की तो जवळपास आहे, एकाने युट्यूबरला संभाषणात गुंतवलं आणि एकानं त्याची चैन खेचली.

ती दोघी मुलं ऑफिसला जाणारी दिसत होती आणि त्यांनी चष्मा घातलेला होता. अरमान मलिकने खूप जाड चैन घातली होती जी 11 तोळ्याची होती. चैन स्नॅचिंगमुळे त्याच्या गळ्यालाही दुखापत झाली आहे.

याआधी अरमान मलिकची कार देखील चोरीला गेली आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया त्याला ट्रोल केलं जात आहे. यांच नेहमीच काही ना काही चोरीला जात असते असंही ते म्हणत आहे.

अरमान आणि त्याचे घरचे नेहमीच वैयक्तिक आयुष्यामुळे यूजर्सच्या निशाण्यावर आहे. दोन बायका आणि चार मुलांचा बाप असल्यामुळे अन् त्यातच आता तो तिसर्‍या महिलेसोबत जिम करताना पाहूनही लोक ट्रोल करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT