Armaan Malik : 'लग्न करताना हिंदू, मग मुलाचं नाव...' अरमान मलिकला नेटकऱ्यांनी वाजवलं!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच तिखट आहेत.
Armaan Malik Kritika Malik viral video hindu muslim angle
Armaan Malik Kritika Malik viral video hindu muslim angle

Armaan Malik Kritika Malik viral video hindu muslim angle : मनोरंजन विश्वात युट्युबर अरमान मलिकचं मोठं नाव आहे. तो सध्याच्या घडीला सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो वेगळ्याच एका कारणामुळे ट्रोल होताना दिसतो आहे. नेटकऱ्यांनी त्याची तर चांगलीच शाळा घेतली आहे.

अऱमान मलिकची दोन लग्न ही चर्चेत आली होती. त्यानं पायल आणि कृतिकाशी लग्न केले. हे सर्वजण एकाच घरात मोठ्या प्रेमानं, गुण्या गोविंदानं राहतात. सोशल मीडियावर अरमानच्या कुटूंबातील व्हिडिओही व्हायरल होताना दिसतात. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अरमानच्या दुसऱ्या पत्नीनं कृतिका मलिकनं एका मुलाला जन्म दिला आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कुटूंबानं त्या मुलाचे नाव जैद मलिक असं ठेवलं आहे. मुलाचे नाव जैद ठेवल्यामुळे अनेकांनी अरमानला ट्रोल केले आहे. दुसऱ्या मुलाचे नाव हवन असे ठेवले आहे.

Also Read - What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच तिखट आहेत. काहींनी अरमान मलिक आणि कृतिका मलिकच्या मुलांचे कौतूक केले आहे. तर काहींनी त्यांना ट्रोल केले आहे. त्यावर एका युझर्सनं लिहिलं आहे की, तू कधी हिंदू होतोस तर कधी मुस्लिम, लग्नाच्यावेळेस मुस्लिम होतोस, तुझे काम मात्र हिंदू धर्मिय जे करतात ते. असं का..असे प्रश्न नेटकऱ्यांनी अरमानला विचारले आहेत.

एका युझर्सनं लिहिलं आहे की, पहिल्यांदा तू एक गोष्ट आम्हाला सांग तुला हिंदू व्हायचं आहे की मुस्लिम, लग्न करायचं असल्यास तू सोयीनं धर्म बदलतो. तर कधी हिंदू होतो. हे काय चाललं आहे. मुलांचे नाव ठेवायची वेळ येते तेव्हा मात्र तू वेगळीच नावं ठेवतो. आणखी एका युझर्सनं लिहिलं आहे की, मुलांची नाव तू मुस्लिम ठेवली आहेत. पण तू हिंदू आहेस. तर मग हे सगळं कशासाठी, तिसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे, हे सगळं तू करताना पायल आणि चिकूचा विचार केलेला दिसत नाही.

Armaan Malik Kritika Malik viral video hindu muslim angle
Virat Kohli : किंग कोहली करणार बॉलिवूडमध्ये काम? प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com