मराठवाडा

'या' गावात एकही दुमजली घर नाही, वीट अन् चुन्यांशिवाय होते बांधकाम; काय आहे दिडशे वर्षांची परंपरा?

नवनाथ इधाटे

फुलंब्री : काही परंपरा थेट मानवी जीवनावर परिणाम करतात. परंपरेत जखडल्याने गावकऱ्यांची राहण्याची पद्धत बदलून जाते. श्रद्धेच्या पगड्याने म्हणा किंवा आलेल्या अनुभवांमुळे म्हणा, परंपरेच्या पालनाचा कसोशीने प्रयत्न सुरू राहतो. कालांतराने ती गावची ओळख बनून जात असल्याचे वैशिष्ट्य ठरते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द हे असेच जगावेगळे गाव आहे. या गावात चुना व  वीट न वापरता घराचे बांधकाम केले जाते. गावात आजपर्यंत एकही दुमजली इमारत असलेले घर नाही. हिंदू – मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या शहमिया बाबा यांचा दर्गावर भाविकांची श्रद्धा आहे.

तालुक्यातील आडगाव खुर्द येथे एकही दुमजली जूनी माडी किंवा नव्याने बांधण्यात आलेली दुमजली इमरात नाही. आज तंत्रज्ञानाच्या युगात अशी श्रद्धा कायम आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहराच्या पूर्वेला २० किलोमीटरवरचे हे छोटं गाव आहे. या गावालगत असलेल्या पिरबावडा गावातील शहमिया बाबा यांच्या दर्गा हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. पीरबावडा येथेही घर बांधणीसाठी चुना व वीट वापरण्यात येत नाही. मार्च महिन्यातील संकष्ट चतुर्थीला आडगाव खुर्द व पिरबावडा या दोन्ही गावात संदल मिरवणूक रात्री केली जाते. संदलच्या दुसऱ्या दिवशी आडगाव खुर्द व पिरबावडा येथील नागरिक शहामिया बाबांसाठी बोकडचा बळी प्रत्येक कुटुंब दर तिसऱ्या वर्षी देत असल्याची वर्षानुवर्ष परंपरा आजही जोपासत आहे.  

प्रथेला फाटा द्यायचे धाडस कुणातही नाही

आता या गावातून शिक्षक, पोलिस, ग्रामसेवक असे नोकरदारही दिसतात. काळाच्या ओघात काही आरसीसी झाली तरी त्यांना मजला नाही. शिक्षण आणि नोकऱ्यांमुळे सुबत्ता आली तरी या प्रथेला कोणी फाटा द्यायचे धाडस करीत नाही. घराचा आडवा विस्तार करून जागेची गरज भागवली जाते. गावातील शाळा, ग्रामपंचायत किंवा अन्य सार्वजनिक, शासकीय इमारती बाबतही हे पथ्य पाळले जाते. कोणी मजला करायला गेला तर जुनी-जाणती अनुभवी मंडळी त्याला आवर घालतात. मग नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेलेली मंडळी बाहेरगावी शहरात दुमजली इमारतीची हौस भागवतात.

बांधकाम क्षेत्रात सध्या अनेक नवी तंत्रे आली आहेत. नव्याने आरसीसी घरे बांधली जाऊ लागली. मात्र आडगाव खुर्द येथील ग्रामस्थ वर्षानुवर्ष सुरु असलेली परंपरा कायम ठेऊन घर बांधतांना चुना, विटा न वापरता घराचे बांधकाम पूर्ण करतात. तसेच दुमजली इमारत न बांधण्याची गावातील सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आजही कायम आहे.

- देविदास तुपे, शिक्षक आडगाव खुर्द

आडगाव खुर्द येथे वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा आजही कायम असून गावामध्ये एकही दोन मजली असलेली घरे अद्याप नाही. तसेच चुना व मातीच्या विटाचे घर बांधण्यासाठी वापरही केला जात नाही. गावात आरसीसी पद्धतीने घर बांधले जाते मात्र यात विटा न वापरता काँक्रेट पद्धतीने घराचे काम केले जाते. ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू असून आजही गावात जोपासली जाते.

- काकाजी तुपे, माजी सरपंच आडगाव खुर्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT