औरंगाबाद : इच्छुकांचे प्रभागरचना आराखड्याकडे लक्ष  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : इच्छुकांचे प्रभागरचना आराखड्याकडे लक्ष

अडीच लाख मतदारांची वाढ : राज्य निवडणूक आयोगासमोर सादरीकरण होणार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिका प्रभाग रचनेचा आराखड्याचे बुधवारी (ता.१५) राज्य निवडणूक आयोगासमोर सादरीकरण होणार आहे. या आराखड्याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान यावेळीच शहरात अडीच लाखाहून अधिक मतदारांची वाढ झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत या नव मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक प्रभागरचनेनुसार होणे निश्‍चित झाले आहे. यामुळे आता नगरसेवकांची संख्या ११५ वरून १२६ एवढी होणार आहे. यामुळे इच्छुकांच्या राजकीय आकांक्षांना घुमारे फुटले आहेत. एप्रिल २०२० मध्ये होणारी मनपाची सार्वत्रिक निवडणूक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडली आहे, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. राज्य आयोगाने प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्याचे महापालिकेला दिले असून त्यानुसार या आराखड्याचे सादरीकरण होणार आहे.

दरम्यान, वॉर्ड रचना तयार करून तीन वॉर्डांचा एक प्रभाग या पद्धतीने प्रभागरचना करण्यात आलेली आहे. १२६ वॉर्ड विचारात घेता ४२ प्रभाग झाले आहेत. विद्यमान वॉर्डातूनच वॉर्डाची संख्या वाढली आहे. काही ठिकाणी वॉर्डाच्या सीमा कमी करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या वॉर्डात कुठपर्यंत सीमा आहेत, त्या आपल्यासाठी सोयीच्या आहेत का याकडे सध्या इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT