unknown car unknown car
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये आढळली बेवारस कार; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

सिडकोतील वसंतराव नाईक चौकात एक महिंद्रा कंपनीची एक कार बेवारसपणे कालपासून उभी होती

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: सिडकोतील वसंतराव नाईक चौकात एक महिंद्रा कंपनीची एक कार बेवारसपणे कालपासून उभी होती. याविषयी बॉम्ब शोधक विथ पथकाकडे कॉल आला त्यानुसार बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तपास पथकाने कारची तपासणी केली मात्र कारमध्ये काही आढळून आलेले नाही.

वसंतराव नाईक चौकाचे उड्डाणपुलाखाली बेवारसरित्या एक महिंद्रा कंपनीची कार (एम. एच. 16 ए. टी. 6024) क्रमांकाची कार बेवारसपणे आढळून आली. शोधक पथकाने घटनास्थळी येत पुर्ण डॉग स्कॉडसह कारची तपासणी केली मात्र कारमध्ये काही आढळून आले नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान याची माहिती बॉम्बशोधक पथकाचे राजू घाटे यांनी दिली.

मागील दोन दिवसांपासून बेवारसरित्या ही कार सिडकोतील वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलाखाली उभी होती. ही कार संशयास्पद असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर तात्काळ बॉम्बशोधक पथक तेथे आले होते. बॉम्बशोधक पथकाने कारच्या काचा फोडून पूर्ण तपासणी केली मात्र यात काहीच आढळून आले नाही.

या कारवाईसाठी बॉम्बशोधक (बीडीडीएस) पथकाचे राजू घाटे, श्वान झेब्रा आणि टीम यांनी पुढाकार घेतला. पुढील कारवाईसाठी ही कार एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे, अशी माहिती बॉम्बशोधक पथकातर्फे देण्यात आली.

(बातमीदार- प्रकाश बनकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT