esakal | Corona Updates: चिंताजनक! बीडमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या हजारी पार
sakal

बोलून बातमी शोधा

Beed corona updates

Corona Updates: चिंताजनक! बीडमध्ये पुन्हा रुग्णसंख्या हजारी पार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: कोरोना विषाणू संसर्गबाधीत रुग्णांची संख्या तर वाढती आहेच. शिवाय आता तपासणीतून आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही 30 टक्क्यांवर पोचले आहे. शुक्रवारी (ता. 16) 1 हजार 5 रुग्ण आढळून आले. तर चार नवीन मृत्यूंची नोंद झाली.

मधल्या काळात तपासणींची संख्या पाच ते सात हजारांच्या घरात होती. त्यावेळी साधारण सातशे ते नऊशे रुग्ण आढळत होते. शुक्रवारी केवळ 3655 लोकांच्या तपासणीत 1005 रुग्ण आढळून आले. रुग्ण आढळण्याचे प्रमाण तब्बल तीस टक्क्यांच्या पुढे आहे. दरम्यान, जिल्ह्याची रुग्णसंख्या तब्ल 36 हजार 957 झाली. तर, चार नवीन मृत्यूंसह जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा 738 झाला आहे.

7 हजार 227 सक्रिय रुग्ण-

कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात 2720 ही सर्वोच्च सक्रीय रुग्ण संख्या होती. विशेष म्हणजे त्यावेळी कोरोना विषाणू संसर्ग सुरु होऊन सहा महिने लोटलेले होते. दुसरी लाट फेब्रुवारी अखेर सुरु झाली. या दिडच महिन्यात जिल्ह्याची सक्रीय रुग्णांची संख्या 7227 झाली आहे. यातील 4302 रुग्ण ॲडमिट आहेत. यातील चारशे रुग्ण बाहेर जिल्ह्यात उपचार घेत आहेत. तर, 2923 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.