Arrested Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : डीफार्मसीच्या विद्यार्थ्याने केली चोरी

पावणेदोन लाखांचा ऐवज हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पडेगाव परिसरातील अन्सार कॉलनी येथे घरफोडी करणाऱ्या विद्यार्थी असलेल्या चोरट्याला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक महिलेच्या मतिमंद नातूशी मैत्री करून घरात प्रवेश मिळवल्यानंतर सदर विद्यार्थ्याने हा चोरीचा गुन्हा केला. त्याच्या ताब्यातून एक लाख ८६ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.

शेख आफताब शेख मुनीर (वय १९, रा.लोकसेवा दूध डेअरीमागे, अन्सार कॉलनी, पडेगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या विद्यार्थी घरफोड्याचे नाव आहे. अन्सार कॉलनीतील रहिवासी सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक महिलेच्या घरातून चोरट्याने बुधवारी (ता. सहा) सोन्याच्या बांगड्या, गंठण, झुमके, अंगठी असा दोन लाख ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.

या प्रकरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विशाल पाटील, विलास मुठे, रमेश गायकवाड आदींच्या पथकाने शेख आफताबच्या घरावर छापा मारून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अन्सार कॉलनी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता सोन्याचे एक गंठण, अंगठी, दोन बांगड्या, कानातील झुमके, पाच मोरण्या असा एकूण १ लाख ८६ हजार ५२५ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

अशी केली चोरी

आफताब हा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी आहे. तो सध्या बेंगलुरू येथे डी फार्मसी करत आहे. अबरार कॉलनीतील सदर महिलेचा मतीमंद नातूशी मैत्री करून त्याने घरात प्रवेश मिळवला. सुरवातीला किरकोळ चोरी केली, तीचा गवगवा झाला नाही. त्यामुळे त्याने संधी मिळताच कपाट फोडून ही चोरी केली. चोरीचे सोने घेऊन तो सोन्याच्या दुकानात गेला, मात्र दुकानदाराला संशय आल्याने त्याने तुझ्या घरातील मोठ्या व्यक्तीला घेऊन ये असे सांगितले. त्यामुळे आफताबने एका महिलेला पाच हजार रुपये देऊन तीला आत्या म्हणून उभे करून सोने विक्री केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT