sakal news 
छत्रपती संभाजीनगर

गरिबीने केली थट्टा! अंत्यविधीसाठी मृतदेह गावी नेण्यासाठी नातलगांकडे पैसे नव्हते

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : घरी अठराविश्वे दारिद्र्य. गाव सोडून उदरनिर्वाहासाठी एका हॉटेलमध्ये आचाऱ्याचे काम करून फाटक्या संसाराला ठिगळे देण्याचे काम ते करीत होते. पण, अचानक रोहिलागड-अंबड रस्त्यावर दुचाकी अपघातात काळाने त्यांच्यावर घाला घातला. पण, मरणानंतरही त्यांची व्यथा संपली नाही. अंत्यविधीसाठी मृतदेह गावी नेण्यासाठी नातलगांकडे पैसे नव्हते. नाही म्हणायला रुग्णालयात असलेल्या काहींनी वर्गणी करून अडीच हजार जमा केले. मात्र, एवढ्या पैशात कुणीही वाहनधारक बीडला जाण्यास तयार होत नव्हता. ही बाब जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे यांना कळल्यानंतर त्यांनी शववाहिकेची व्यवस्था केली.


अनीस गफूर पठाण (वय ४५ रा. बीड, ह. मु. आपतगाव, ता.औरंगाबाद) आणि संगीता ऊर्फ राहिबाई आश्रुबा कांबळे (रा. आडगाव) हे घरची परिस्थिती बिकट असल्याने उदरनिर्वाहासाठी कुटुंबीयासह आपतगाव येथे काही वर्षांपूर्वी आले होते. ते रोहिलागड (ता. अंबड) येथील मातोश्री हॉटेलवर आचारीचे काम करीत होते. काम संपल्यानंतर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीने ते आपतगावकडे जात होते.

अपघातात त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी तीन वाजता पोस्टमार्टेमनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाइकांकडे पैसे नव्हते. त्यामुळे तो रुग्णालयातच ठेवलेला होता. हे पाहून रुग्णालयात असलेल्यांचे मन हेलावले. त्यांनी वर्गणी करून अडीच हजार रुपये जमा केले. परंतु, अडीच हजारांत कोणताच वाहनधारक येत नसल्याने त्यांना ताटकळण्याशिवाय पर्याय नव्हता. ही माहिती श्री. भुमरे यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहन उपलब्ध करून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT