sakal
छत्रपती संभाजीनगर

चक्क महापालिकेच्या शाळेतच सुरु होता जुगार अड्डा । Aurangabad

पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल १४ जुगारींना पकडले. कारवाई झाली खरी मात्र पोलिसांचा वचक नसल्याने चक्क जुगाऱ्यांची चक्क शाळेतच अड्डा बनविला होता

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : चक्क महापालिकेच्या शाळेतच जुगार अड्डा सुरु असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल १४ जुगारींना पकडले. कारवाई झाली खरी मात्र पोलिसांचा वचक नसल्याने चक्क जुगाऱ्यांची चक्क शाळेतच अड्डा बनविला होता. हा प्रकार रविवारी (ता.२६) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास शास्त्रीनगरातील महापालिका शाळेच्या सुरक्षारक्षकाच्या खोलीत उघडकीस आला.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुभाष झंडूराम राणा, गौतम नारायण बहुरे, मनोज दिगंबर देवरे, मनोहर नारायण भवरे, शेख चाँद शेख हुसेन, अन्सार रशिद शेख, कदीर नजीर पठाण, मुजफ्फर अफसर शेख, आबीद सादीक कुरेशी, अनिल बबन गुडीवाल, इजाज फिरोज कुरेशी, तालिब मोहम्मद शरीफ खान, नामदेव शिवलाल चव्हाण, मुसा उस्मान शेख या जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून साहित्य व रोख असा ६५ हजार ४१० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक वसंत शेळके यांच्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT