सिंबायोसिसतर्फे बुधवारपासून ‘सिम्बिथॉन २०२१’चे आयोजन

सिंबायोसिस शिक्षण संस्थेच्या ५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान ‘सिम्बिथॉन २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे
Symbiosis
Symbiosissakal
Updated on

पुणे : सिंबायोसिस शिक्षण संस्थेच्या ५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान ‘सिम्बिथॉन २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५१ किलोमीटर धावणे, चालणे अशा व्यायाम प्रकाराचा समावेश असणार आहे. सिंबायोसिसचे आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्माचारी तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर यात सहभागी होणार आहेत.

Symbiosis
भारत बंदच्या पाठींब्यासाठी सांगलीत धरणे आंदोलन

‘सिंबायोसिस’च्या क्रीडा मनोरंजन व आरोग्य विभागातर्फे शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी ‘हृदय ते मेंदू’ म्हणजेच मानसिक आरोग्य हा विषय केंद्रस्थानी ठेवून ‘सिम्बिथॉन २०२१’ चे आयोजन केले आहे. ‘द कोविड वॉरिअर्स रन/वॉक’, ‘द फॅमिली वॉक डे’, ‘वॉक युवर पेट डे’ आणि ‘मानसिक आरोग्यासाठी चाला’ या संकल्पनांवर आधारित ही स्पर्धा असणार आहे.

Symbiosis
डिकसळ : ब्रिटीशकालीन पुलाजवळ कार उजनीच्या पाण्यात

यात सहभागी होणाऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार ५१ किलोमीटरचे अंतर पार करायचे आहे. यात सहभागी होणारे धावून/ चालून किंवा जॉगिंग करून आपल्या सोयीनुसार विश्रांती घेऊन हे अंतर पार करू शकतात. मोबाईल अॅपच्या साहाय्याने निकालांची नोंद केली जाणार आहे, अशी माहिती सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com