Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Crime| बजाजनगरामध्ये दुकानदाराला बेदम मारहाण, दुकानाची तोडफोड

व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी होत आहे.

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद ) : तीन ते चार जणांनी अचानक येऊन दुकानावर दगडफेक करून काचा फोडल्या. त्यानंतर दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार शस्त्राने खुपसून टाकण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी (ता.३०) दुपारी औरंगाबादमधील (Aurangabad) बजाजनगर (Bajajnagar) येथे घडली. बजाजनगर येथील आरएम ९७ येथे श्री ऑटो केअर या दुकानात दुकानदार भूषण रूपचंद अग्रवाल, त्यांचा मित्र सागर चोरडिया व ग्राहक असे बसलेले असताना तीन ते चार जण अचानक दुकानावर आले. (Brutally Beaten Shop Keeper In Bajajnagar Of Aurangabad)

त्यांनी शिवीगाळ करत दुकानाच्या काचा फोडल्या. त्यानंतर भूषण अग्रवाल याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व हाताचापटाने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे धारदार हत्यारानी खुपसून टाकण्याची व दुचाकीतील पेट्रोल काढून दुकान जाळण्याची धमकीही हल्लेखोरांनी दिली.

या घटनेनंतर बजाजनगर परिसरात व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT