sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : वाराणसीच्या धर्तीवर होणार आंतरराष्ट्रीय स्टेडियम विकसित

एसपीव्हीचा प्रस्ताव शासनाकडे; जागेची प्रतीक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी गरवारे स्टेडीयम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमआयडीसी, एमटीडीसीकडून सुमारे २७ एकर जागा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेकल) स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला पाठविल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करीत असलेल्या वाराणसीमध्ये सध्या स्टेडियमचे काम सुरू आहे. या कामाची माहिती महापालिका अधिकारी घेणार आहेत.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात आंतरराष्ट्रीय स्टेडीयम उभारण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी चार महिन्यांपूर्वी घेतला आहे. त्यानुसार त्यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्टेडियमसाठी निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यात एमआयडीसीकडून जागा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. गरवारे स्टेडीयम शेजारील अडीच एकर जागा कलाग्रामसाठी एमटीडीसीला देण्यात आली होती.

ही जागा देखील परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात जी. श्रीकांत यांनी सांगितले की, स्टेडिमयच्या कामासाठी एसपीव्ही स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी आल्यानंतर एसपीव्ही स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. दरम्यान वाराणसी येथे क्रिकेट स्टेडियमचे काम सध्या सुरू आहे. हे काम कशा पद्धतीने केले जात आहे, याची माहिती घेण्याची सूचना जी. श्रीकांत यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली आहे.

२६५ कोटींचा प्रस्ताव

आंतरराष्ट्रीय स्टेडीयम उभारण्यासाठी पीएमसी म्हणून अजय ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी २६५ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. स्टेडियमसाठी महापालिका अर्थसंकल्पात टप्प्या-टप्प्याने तरतूद करणार आहे. तसेच पव्हेलियनसाठी प्रायोजक घेऊन त्यांच्याकडून देखील निधी उभारला जाईल, असे जी. श्रीकांत यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT