Satara Politics : दादांची 'दादागिरी' साताऱ्यात चालेल का ? पालकमंत्री पदावरून जोरदार चर्चा ...

अजित पवार गटाचे वाई , खंडाळा, महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील
satara
satarasakal

अजिंक्य धायगुडे

शिंदे सरकारकडून ज्या मंत्र्याकडे दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार होता, त्यांच्याकडून तो काढून घेऊन दुसऱ्या मंत्र्यांना संधी देण्यात आली. शिंदे सरकारमधे नव्याने सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते . अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आणि एकाच दिवसात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पालकमंत्री पदाची माळ थेट अजित पवार यांच्या गळ्यात घालण्यात आली.

या बदलामुळे अर्थात पुण्यातील भाजपा कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जल्लोष करण्यात आला.परंतु पुण्याची आणि साताऱ्याची राजकीय परिस्तिथी वेगळी आहे. पुण्यात कसबा पेठच्या पोटनिवडणुकीपासून चंद्रकांत पाटील काहीशे बॅकफूटला गेल्याचे दिसून येत होते.

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सद्यस्थितीला अजित पवारांची नाराजी भाजपला न परवडणारी आहे. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीनंतर त्वरित पालकमंत्री पदाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवला गेला.

satara
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

अजित पवार गट साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यापासून सुरु आहे. अजित पवार गटाचे वाई , खंडाळा, महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील हे अजित पवारांचे विश्वासू आणि जिल्ह्यच्या राजकारणात आपली वेगळी ओळख राखून आहेत. अजित पवार गटातून जेव्हा ९ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यावेळी आमदार मकरंद पाटील यांचेही नाव होते.

परंतु त्यावेळी ते मंत्री पदापर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यांची मंत्री पदाची संधी हुकली अशी चर्चा आहे .मकरंद पाटील यांच्याकडे दोन सहकारी ऊस कारखाने, तसेच त्यांचे बंधू सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असल्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांचा दबदबा असल्याचे सांगितले जाते. त्यांनी या पूर्वीही ऊस कारखान्यांसाठी मंत्री पद सोडल्याचे उघडपणे सांगितले आहे. आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे नाव नक्की असणार आहे अशी जिल्ह्यात चर्चा आहे.

satara
Mumbai News : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट ; कोणते मंत्री येणार अडचणीत ?

या घडीला साताऱ्याचे पालकमंत्री पद पाटण विधानसभा मतदार संघाचे शिंदे गट शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा आणि ठाणे या मुख्यमंत्र्यासाठी महत्वाच्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये आपल्या सर्वात विश्वासू असलेल्या मंत्र्याला पालकमंत्री पदाची धुरा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

satara
Sangli News : १९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे उपोषण 'ह्या' आहेत मागण्या

एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले तेव्हा त्यांच्या सोबत जाणारे पहिले आमदार शंभूराज देसाई असल्याचे सांगितलं जातं . त्यामुळे आपल्या सर्वात जवळच्या मंत्र्यांकडून साताऱ्याचं पालकमंत्री पद काढून ते मंत्री मंडळ विस्तार झाल्यास अजित पवार गटातील आमदाराला मुखमंत्री एकनाथ शिंदे देतील का ? पुण्यात जमलेली गणितं अजित पवारांना साताऱ्यात जमतील का ? साताऱ्याचं पालकमंत्री पद आपल्या गटातील आमदाराला देण्यासाठी अजित पवारांची दादागिरी साताऱ्यात चालेल का ? हे आगामी काळात समजणार आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com