corona vaccination corona vaccination
छत्रपती संभाजीनगर

Corona Vaccination: औरंगाबादमध्ये ग्रामीण भागात लसीकरणाला ब्रेक

नागरिक लसीकरण केंद्रावर येवून परत जात आहेत. तर सुरुवातीला दुसऱ्या डोसमध्ये असलेले अंतर प्रशासनाने वाढविल्याने अधिक अडचणी येत आहेत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. परंतु लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला तरी लसीच्या तुटवड्यामुळे ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांना देखील लसीकरिता दिवसेंदिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. तर सध्या शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही लस नसल्याचे आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले.
लसीकरण मोहिमेला सात महिने पूर्ण होत आले आहेत. तरी देखील लसीकरण पूर्ण झालेले नाही. पहिला डोस घेणाऱ्यांबरोबरच दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. परंतु दुसरा डोस घेणाऱ्यांना देखील लस मिळत नसल्याचे समोर आले आहे.

नागरिक लसीकरण केंद्रावर येवून परत जात आहेत. तर सुरुवातीला दुसऱ्या डोसमध्ये असलेले अंतर प्रशासनाने वाढविल्याने अधिक अडचणी येत आहेत. तर येवून रांगेत उभे राहून पुन्हा लस नाही म्हणून परतावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय आता तिसऱ्या लाटेविषयी बोलले जात आहे. तेंव्हा लसीकरणावर प्रशासनाने भर द्यायला हवा. सध्या ग्रामीण भागात लसीचा तुटवडा तर आहेत. शिवाय पेरणी सुरु झाल्याने लोक शेतात जातात त्यामुळे प्रतिसादही कमी झाल्याचे गलांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT