Rape Logo Rape Logo
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad News : पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार

माझा नवस पूर्ण झाला आहे, असे म्हणून तरुणाने पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ काढला.

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : माझा नवस पूर्ण झाला आहे, असे म्हणून २३ वर्षीय एका ओळखीच्या तरुणाने पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन एका ३० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ काढला. तो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची (Waluj) धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडलेली ही घटना शनिवारी (ता.११) रोजी उघडकीस (Crime Against Woman) आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे विवाहित महिला कुटुंबासह राहते. ८ एप्रिल २०२१ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही महिला घरी एकटी असतांना तिच्या पतीच्या ओळखीचा नितीन अशोक पतंगे (वय २३, रा.नर्सरी काॅलनी, रांजणगाव) हा महिलेच्या घरी आला. व आमचा (Aurangabad Crime Updates) नवस पूर्ण झाला, असे म्हणत त्याच्या जवळील बॉक्समधील एक पेढा तिला खाण्यास दिला.

तिने पेढा खाल्ल्यानंतर तिला गुंगी येऊन ती बेशुद्ध पडल्याचे पाहून नितीन याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान महिलेला जाग आली तेव्हा हा प्रकार तिच्या लक्षात आला. यामुळे महिलेने नितीन यास याविषयी जाब विचारला असता त्याने अत्याचाराचा काढलेला व्हिडीओ दाखवून तू जर माझ्या सोबत राहिली नाही, माझ्या मर्जीप्रमाणे वागली नाही तर मी हा व्हिडीओ व्हायरल करील. तसेच तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारील, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने कोणाकडेच अत्याचाराची वाच्छता केली नाही. त्यानंतर नितीन याने महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले. नितीनकडून होणाऱ्या सततच्या अत्याचाराला कंटाळून महिलेने सायंकाळी तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. पतीने महिलेस समजावून सांगत धीर दिल्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT