Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Crime| सात लाखांसाठी छळ, नवविवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अवघ्या १४ महिन्यांपूर्वी प्रांजलाचा विवाह झाला होता. माहेरच्या मंडळींनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत ठिय्या मांडला.

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : अवघ्या १४ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेस माहेरहून सात लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.एक) रोजी दुपारी औरंगपूर येथे घडली आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वाहेगाव (ता.गंगापूर) येथील रामचंद्र मनाळ यांची एकुलती एक मुलगी प्रांजली हिचा विवाह अवघ्या १४ महिन्यांपुर्वी औरंगपूर (हर्सुली) येथील अक्षय तात्याराव शिंदे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर आरोपी अक्षय तात्याराव शिंदे (पती), सासरा तात्याराव खंडेराव शिंदे (सासरा) व कमलबाई तात्याराव शिंदे (सासू) यांनी प्रांजली हिस माहेरहून सात लाख रुपये आणण्याची मागणी केली. मात्र ती पूर्ण होत नसल्याने आरोपींनी प्रांजलीचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला. (Newly Married Women End Herself In Aurangabad)

त्यामुळे प्रांजलीने मंगळवारी (ता.एक) दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सायंकाळी तिचा मृतदेह काढून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर आज बुधवारी (ता.दोन) प्रांजलीच्या माहेरच्या मंडळींनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वाळूज (Waluj) पोलिस ठाण्यात धाव घेत ठिय्या मांडला. या आरोपींमध्ये छावणी पोलीस ठाण्याच्या पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. अखेर पाच तासानंतर वाळूज पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Aurangabad Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT