Babasaheb Dhekale 
छत्रपती संभाजीनगर

लग्नाची हळद फिटण्यापूर्वीच एकुलत्या एक मुलावर काळाचा घाला, ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू

मुनाफ शेख

आडुळ (जि.औरंगाबाद) : अवघ्या ३३ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गेवराई-आडुळ रस्त्यावर आडुळ खुर्द (ता.पैठण) शिवारात रविवारी (ता.तीन) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.  बाबासाहेब उर्दू काजल संजय ढोकळे (२१ वर्षे, रा. आडुळ बु. ता.पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. बाबासाहेब हा दुचाकीवरुन (एमएच२० सीएल ५१४९) आडुळ खुर्दकडून आडुळ फाट्याकडे येत होता. त्यावेळी आडुळ फाट्याकडून आडुळ खुर्दकडे जाणाऱ्या एका ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आडुळ येथील १०८ रुग्णवाहिकेचे चालक नासेर सय्यद, डॉक्टर असलम सय्यद यांनी तत्काळ जखमी तरुणास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. मात्र, औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जगन्नाथ उबाळे, रवींद्र क्षीरसागर, विश्वजित धन्वे हे करीत आहेत.



आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा
बाबासाहेबचे ३३ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार बहिणी, आई, वडील असा परिवार आहे. त्याच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Jalgaon Water Crisis : जळगावकरांवर जलसंकटाची टांगती तलवार! १४ कोटींच्या थकबाकीमुळे २७ मार्चपासून पाणीपुरवठा बंदचा इशारा

SCROLL FOR NEXT