भाजपचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे संभाजीनगरला विरोध; आठवले म्हणाले, नामांतरास राहिल विरोध

ई सकाळ टीम
Sunday, 3 January 2021

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करावे अशी मागणी होत आहे. त्याला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शवला आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करावे अशी मागणी होत आहे. त्याला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शवला आहे. नाव बदलून विकास होत नाही, असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष औरंगाबादचे नामांतर करावे अशी मागणी करित आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अतुल सावे यांनी उड्या घेतल्याचे दिसले. मात्र भाजप नेतृत्व करित असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) संभाजीनगरला विरोध केला आहे. रविवारी(ता.तीन) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ट्विट करुन औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध केला आहे.

 

 

 

सामनातून भाजपचा समाचार
औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील शनिवारच्या (ता.दोन) ‘संभाजीनगर!’ या संपादकीयातून समाचार घेण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे, की औरंगाबाद शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास ‘गलीच्छ’ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही, असे स्पष्ट करित संपादकीयामध्ये पुढे म्हटले, की विरोध जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करुन टाकले व जनतेने ते स्वीकारले.

 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale Opposed Renaming Aurangabad