Praniti_Shinde 
छत्रपती संभाजीनगर

सरकार आपले पण कामे होत नाहीत, प्रणिती शिंदेंची नाराजी

माधव इतबारे

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आपले आहे पण आपली कामे होत नाहीत, याची मला जाणीव आहे. आपली कामे व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन कॉंग्रेसेच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी केले. औरंगाबाद (Aurangabad) शहर दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी (ता. २४) रात्री गांधी भवनात शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. देशाला फक्त कॉंग्रेस पक्षच (Congress Party) बळकट करू शकते. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना स्वातंत्र्य लढ्यातील बलीदान माहीत नाही. ते इतिहास पुसायला निघाले आहेत. अशा स्थितीत लोकशाही टिकविण्याची जबाबदारी कॉंग्रेस पक्षाची आहे, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उत्तराधिकारी म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे मत व्यक्त केले. आमदार लहु कानडे यांचे यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाला राजेश राठोड, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, इब्राहिम पठाण, सरोज मसलगे, सुरेखा पानकडे, सीमा थोरात, रेखा राऊत, अनिता भंडारी, डॉ. पवण डोंगरे, अतिष पितळे, जयप्रकाश नारनवरे, मुदस्सर अन्सारी, योगेश मसलगे, अरुण शिरसाट, एम. ए. अजहर, संजय वाघमारे, कैसर बाबा, मोहसीन खान यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT