पोटचा गोळा गेल्याचे बघताच आईने फोडला टाहो, लोक झाले भावूक

तुषार महेर
तुषार महेर

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : शहरातील (Sillod) वळण रस्त्यावर दुचाकी व ट्रकमध्ये झालेल्या अपघातामध्ये एकाचा जागेवर मृत्यू, तर दुसऱ्या जखमीचा औरंगाबाद (Aurangabad) येथे उपचारासाठी जात असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.२४) दुपारच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तुषार विठ्ठल महेर (वय १३ रा.वाघधाववाडी, उपळी, ता.सिल्लोड), देवसिंग रामधन राजडवाड (वय ४२, रा.मुठाड, ता.भोकरदन) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील वळण रस्त्यावर ट्रकने व दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या तुषारचा जागीच मृत्यू झाला. तर राजरवाळ हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित औरंगाबाद येथे (Accident In Aurangabad) उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

तुषार महेर
तीन बहिणींच्या लाडक्या भावाला काळाने हिरावले,राखी बांधणे राहिले

आई, वडिलांपासून घटना लपविली

अपघातात मृत्यू झालेल्या तुषारचे वडील आजारी असल्याने औरंगाबादेतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याची आई आणि भाऊ हे सुद्धा वडिलांच्या सेवेसाठी रुग्णालयातच थांबलेले आहेत. या अपघातात तुषार ठार झाल्याची माहिती वडिलांना झाल्यास त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. याची खबरदारी घेत नातेवाइकांनी केवळ आई आणि भावालाच याबाबत कळविले. यानंतर ते घरगुती कारण सांगून रुग्णालयाबाहेर आले. सायंकाळी उशिरा आई, भाऊ, नातेवाइकांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत तुषारच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकीकडे पती आजारपणाला लढा देत असताना पोटचा गोळा जग सोडून गेल्याने तुषारचा मृतदेह बघताच आईने टाहो फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com