Raj Thackeray sakal
छत्रपती संभाजीनगर

राज ठाकरेंना पाळावे लागणार औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांचे 'हे' नियम

अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी आज परवानगी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी आज गुरुवारी (ता.२८) परवानगी दिली आहे. पक्षाचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण महाजन यासह इतर नेते औरंगाबाद सभेच्या तयारीसाठी दाखल झाले आहेत. ही राज सभा १ मे रोजी होणार आहे. तत्पूर्वी मराठवाड्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काही दिवसांपासून पक्षाचे नेते सभेला मंजूरी मिळाल्याचे सांगत होते. मात्र औरंगाबाद पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी त्याला मंजूरी दिलेली नव्हती. मात्र आज अखेर त्यांनी सभेला परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या आहेत.

अटी

- १५ हजारांपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये.

- सभेला जाताना-येताना कोणतीही घोषणाबाजी करु नये

- सभेच्या ठिकाणी फेरी काढू नये

- स्वयंसेवकांची नेमणूक करावी. त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक सिटी पोलिस चौकाकडे द्यावे.

- सायंकाळी ४.३० ते ९.३० रात्री दरम्यानच सभा आयोजित करावी

- वंश, जात, भाषा यावरुन चिथावणी देऊ नये.

- सभेत येणाऱ्यांना स्वयंशिस्त पाळावी, असभ्य वर्तन करु नये

- पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा

- स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगू नये

- चेंगराचेंगरी झाल्यास संयोजक जबाबदार राहतील

- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे

- आवाजाच्या मर्यादेची पालन करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT