Aurangabad | औरंगाबादेत भीषण अपघात; दोन ठार, ट्रक चालकासह तीन जण जखमी

भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर ट्रकने रस्त्याची डागडुजी करणाऱ्या मजुर व ट्रॅक्टरला जोराची धडक
Aurangabad Accident Updates
Aurangabad Accident Updatesesakal

वाळूज (जि.औरंगाबाद ) : भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर ट्रकने रस्त्याची डागडुजी करणाऱ्या मजुर व ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन मजूर जागीच ठार, ट्रक चालकासह दोन मजूर मिळुन तीन जखमी झाले. यातील चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात वाळूज (Waluj) परिसरातील करोडी शिवारात गुरुवारी (ता.२८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झाला. तेलंगणा राज्यातील आयशर ट्रक (टीएस०८ युए २०८८) हा धुळे-सोलापूर महामार्गाने कन्नडकडून वाळूज एमआयडीसी मार्गे जालनाकडे जात होता. तर धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी शिवारात असलेल्या टोलनाक्यापासून जवळ जवळ दीड किलोमीटर अंतरावर काही मजूर डागडुजीचे काम करत होते. (Two People Died, Three Injured In Accident In Aurangabad)

Aurangabad Accident Updates
Aurangabad| सुनेने केला सासूचा खून, जळालेले लाकूड मारले डोक्यात मारले

त्यासाठी ट्रॅक्टरचा (एमएच २० सीएच ९३५१) उपयोग करण्यात येत होता. हे मजूर रस्त्याची डागडुजी करीत असताना भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने मजुरांना चिरडत ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातात दोन मजूर जागीच ठार, तर आयशर चालकासह दोन मजूर मिळून तिघे जखमी झाले असून चालकाची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच १०८ या सरकारी रुग्णालयाचे पायलट राजू रोकडे यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना घाटीत दाखल केले.

Aurangabad Accident Updates
Jalna Accident | जालन्यात ट्रक-रिक्षाची जोरात धडक, दोन जण जागीच ठार

या अपघातात औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील दिवशी पिंपळगाव ( ता.गंगापूर) येथील सोमनाथ भानुदास सर्जे ( वय ५२ ) व सीताराम कारभारी जाधव (वय ५१) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. आयशर ट्रकचालक भुपेंद्रसिंग (५३) यांच्यासह मजूर सोमनाथ कापसे (३५) व सावित्री दिवटे (३३) हेही जखमी झाले असून त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com