Burning Bus In Aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad| धावत्या बसने घेतली पेट, चालकामुळे २८ प्रवाशांचा वाचला जीव

पेट घेतल्याने बस जळून खाक झाली.

सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद ) : औरंगाबाद (Aurangabad) -जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा गावाजवळ गुरुवारी (ता.२४) पहाटेच्या सुमारास धावत्या बसने पेट घेतल्याने बस जळून खाक झाली. सुदैवाने बसचालक, वाहकासह बसमधील २८ प्रवासी सुखरूप असून, परिसरातील नागरिकांसह अजिंठा पोलिसांनी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती अशी की, पुणे येथून मलकापूरकडे जाणारी श्री साई राम ट्रॅव्हल्सची बस (एमएच १२ इक्यू ९००७) अजिंठा (Ajanta) गावालगत आली. (Running Bus Catch Fire On Aurangabad Jalgaon Highway , 28 Passengers Safe)

येथे महामार्गावरील भारत दर्शन हॉटेल जवळील वळणावर बसच्या टायरचे लायनर चिटकुन टायर फुटल्याने बसला पहाटे पाच वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे कळताच चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला घेत बसमधील २८ प्रवाशांना उतरविल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेत बस संपूर्णपणे जळून खाक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT