Crime News Esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : झोपलेल्या मुलाला वडिलांचा चुकून धक्का लागला; मुलानं थेट लोखंडी कड्यानं बापाचं डोकंच फोडलं

देवपूजा झाल्यानंतर देवपूजेचे पाणी घराबाहेर घेऊन जाताना झोपलेल्या मुलाला वडिलांचा चुकून धक्का लागला.

सकाळ डिजिटल टीम

राजेंद्र यांचा मुलाला चुकून धक्का लागला. त्याचा राग आल्याने मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली.

छत्रपती संभाजीनगर : देवपूजा झाल्यानंतर देवपूजेचे पाणी घराबाहेर घेऊन जाताना झोपलेल्या मुलाला वडिलांचा चुकून धक्का लागला. या कारणावरून मुलाने हातातील लोखंडी कड्याने चक्क वडिलांचे डोके फोडले. घरातील साहित्याची तोडफोड करत नासधूस केली.

मारहाणीत वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी सिडको एन-७ परिसरातील त्रिवेणीनगरात घडली. या प्रकरणी पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून मुलाविरोधात सिडको पोलिस ठाण्यात (CIDCO Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. अमोल राजेंद्र ऊर्फ राजेश पाराशर (रा. त्रिवेणीनगर) असे मुलाचे नाव आहे.

या प्रकरणी जखमी राजेंद्र बाबुराव पाराशर (६४) यांनी फिर्याद दिली. ते माजी सैनिक असून सध्या घरीच असतात. फिर्यादी राजेंद्र हे ८ नोव्हेंबरच्या सकाळी साडेनऊदरम्यान देवपूजा करत होते. पूजा आटोपल्यानंतर पूजेचे पाणी बाहेर टाकण्यासाठी ते घराबाहेर जात होते. त्यावेळी घरातील हॉलमध्ये त्यांचा मुलगा झोपला होता.

राजेंद्र यांचा मुलाला चुकून धक्का लागला. त्याचा राग आल्याने मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली. हातातील लोखंडी कडे वडिलांच्या मारल्याने त्यांच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. रक्तबंबाळ झालेल्या वडिलांनी मुलाच्या विरोधात तक्रार दिली. अधिक तपास हवालदार भालेराव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT