गंगापूर अपघात sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : गंगापूरला अपघातात बापासह दोन मुले ठार ; पत्नी गंभीर, मजूर कुटुंबावर घाला

दुचाकीला वाहनाने धडक दिल्यामुळे बाप, मुलगी व मुलगा जागीच ठार झाल्याची घटना वैजापूर-गंगापूर मार्गावरील मांजरी फाट्यावर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

गंगापूर : दुचाकीला वाहनाने धडक दिल्यामुळे बाप, मुलगी व मुलगा जागीच ठार झाल्याची घटना वैजापूर-गंगापूर मार्गावरील मांजरी फाट्यावर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. दशरथ भूमसिंग रंधावे (वय ३०), कृष्णा दशरथ रंधावे (तीन) व नानी दशरथ रंधावे (एक वर्ष, सर्व रा. मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. पत्नी राधिका दशरथ रंधावे (२५) ही गंभीर जखमी झाली आहे. तिघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राधिका रंधावे हिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मध्य प्रदेशातून पत्नी व मुले छत्रपती संभाजीनगर येथे आली होती. त्यांना घेण्यासाठी पती दशरथ भूमसिंग रंधावे हे दुचाकीने मांजरी शिवारातून संभाजीनगरला गेले होते. बऱ्याच दिवसांनी पत्नी, मुलांची भेट झाल्याने ते आनंदात होते.

या तिघांना घेऊन ते दुचाकीने छत्रपती संभाजीनगरातून मांजरी शिवाराकडे निघाले होते. शिवार अगदी पाचशे फुटांवर असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दशरथ यांच्यासह त्यांचा मुलगा व मुलगी ठार झाली. मांजरी शिवारातील गणेश नावंदर यांच्या शेतात काम करण्यासाठी वर्षभरापासून रंधावे कुटुंब आले होते. काही दिवसांसाठी पत्नी व दोन मुले गावी गेली होती. हातावर पोट असलेल्या या कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातला.

अंत्यविधी मध्य प्रदेशात

येथील उपजिल्हा रुग्णालयामार्फत तिन्ही मृतदेह रात्री उशिरा मध्य प्रदेश येथे मूळगावी पाठविण्यात आले. कुटुंबातील तिघांचा अपघाताने बळी घेतल्याची माहिती जखमी राधिकाला उशिरार्यंत देण्यात आलेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT