Waluj Police Chhatrapati Sambhajinagar esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar : लग्नास विरोध झाल्यामुळं दोघं पळून गेले अन् आळंदीत लग्न केलं; पण पोलिसांनी 'त्यांना' पकडलंच!

दोघेही वर्षभर सोबत राहिले, नुकतेच ११ मेरोजी तिला १८ वर्षे पूर्ण झाले.

सकाळ डिजिटल टीम

एमआयडीसी वाळूज भागातील एका अल्पवयीन मुलीस (त्यावेळचे वय १७) पळवून नेल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा वर्षभरानंतर शोध लागला. तिच्या घरच्यांकडून लग्नास विरोध झाल्याने दोघेही पुणे जिल्ह्यातील आळंदी (Pune Alandi) येथे पळून गेले होते.

याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या (Minor Girl) आईने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात (Waluj Police Station) गुन्हा दाखल केल्यानंतर अज्ञाताविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

विशेष म्हणजे, दोघेही वर्षभर सोबत राहिले, नुकतेच ११ मेरोजी तिला १८ वर्षे पूर्ण झाले, दोघांनी मिळून तिचा वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ मे २०२३ रोजी आळंदी येथील एका मंगल कार्यालयात विवाह केला. त्यानंतर संभाजीनगरात आले, मात्र त्याच वेळेस ही माहिती पोलिसांना मिळाल्याने वर्षभरापासून शोध सुरु असल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या (एएचटीयु) पथकाने जाऊन दोघांना ताब्यात घेतले.

ही कारवाई १९ मे रोजी सकाळी सहा वाजता जोगेश्वरी भागात करण्यात आली. याप्रकरणी कक्षाच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी सांगितले की, एमआयडीसी वाळूज भागातील एका अल्पवयीन मुलीस (त्यावेळचे वय १७) पळवून नेल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा शोध न लागल्याने हा गुन्हा चार एप्रिल २०२३ रोजी एएचटीयु कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.

दरम्यान, दोघेही पुण्यातील आळंदी (ता.खेड) येथे राहत होते. त्यांनी लग्न केल्यानंतर शहरातील न्यू श्रीरामनगर, जोगेश्वरी येथे आल्याची माहिती एएचटीयु पथकाला मिळाल्याने पथकातील सहायक फौजदार इसाक पठाण, हवालदार डी. डी. खरे, संतोष त्रिभुवन, बाबासाहेब राठोड, जयश्री खांडे, अमृता काबलीये, हिरा चिंचोळकर, पुजा मनगटे यांनी जोगेश्वरी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

Bullock Cart Racing : 'किंग' ठरला सांगलीचा खिलार! बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठताच खोंडांची तुफान क्रेझ; लाख-दीड लाखाचा खोंड विकला जातोय 8 लाखांत

विशेष : इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म कसा भरावा?

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT