Beed News
Beed News Sakal
मराठवाडा

Beed News : ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः चाळणी

कमलेश जाब्रस

माजलगाव : तालुक्यामध्ये जवळपास ९० ग्रामपंचायती आहेत. धरणामुळे शहराची बाजारपेठ समृद्ध आहे. महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढालही होते. परंतु, ग्रामीण भाग शहरांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले. भेगाही पडल्या. रस्त्याला असलेले चढउतार यामुळे वाहनचालकांना मात्र पाठदुखी, कंबरदुखीसह मणक्यांचे आजार जडले आहेत. असे असले तरी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी देशात समृद्धी महामार्गासारख्या अनेक मोठ-मोठ्या मार्गाचे जाळे निर्माण केले आहे. परंतु, आज प्रत्यक्षात पाहिले तर ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत ग्रामीण भाग जोडणारे ग्रामीण रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. माजलगाव शहरापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अनेक गावातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे व प्रलंबित कामे व्हावीत, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांतून होत आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याने मंजरथ येथे पॅंथर सेनेच्या वतीने मोबाइल टॉवरवर चढून लोकप्रतिनिधी, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शोले स्टाइल आंदोलनही करण्यात आले होते.

इतर विकासकामांचे काय?

ग्रामीण भागांविषयी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांची असलेली उदासीनता यामुळे रस्त्यांची चाळणी झाल्याचे चित्र तालुक्यात आहे. त्यामुळे रस्त्याबाबत एवढी उदासीनता असेल तर इतर विकासकामे कशी आणि काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या रस्त्यांची दुरवस्था

राष्ट्रीय महामार्ग ते रिधोरी, राष्ट्रीय महामार्ग ते हिवरा, राष्ट्रीय महामार्ग ते टाकरवण, राजेगाव, किट्टी आडगाव, पुरुषोत्तमपुरी, आबेगाव, बोरगाव, मोगरा मार्गे पोहनरे, डाके पिंप्री, उमरी, लोणगाव, लवूळ, हिंगणवाडी यासह अनेक गावांना राष्ट्रीय महामार्गापर्यंत असणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे तर वाळू घाटाच्या निविदा असणाऱ्या गावातील रस्त्यांना वाळू वाहतुकीमुळे मोठ-मोठे खड्डे पडले. याचा त्रास सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. रस्ते खराब असल्यामुळे परिवहन महामंडळाने अनेक गावातील बसही बंद केल्या आहेत.

मंजरथ गाव तीर्थक्षेत्र विकासाचे ठिकाण आहे. माजलगावपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेला हा रस्ता पूर्णतः खड्यात गेला आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ असल्याने याठिकाणी राज्यभरातून भाविक येतात. परंतु रस्ता मात्र जैसे थेच असल्याने त्रास होत आहे. तत्काळ रस्ता न झाल्यास आंदोलन करू.

- भीमराव कदम, युवक जिल्हाध्यक्ष पॅंथर सेना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT