beed news  sakal
मराठवाडा

Beed News : माजलगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जागरण-गोंधळ आंदोलन

पालिकेत प्रशासकीय काळात अनागोंदी कारभार

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव - प्रशासकीय काळात नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ता. १८ रोजी जागरण गोंधळ आंदोलन माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

शहरामध्ये विविध समस्या निर्माण झाल्या असून पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मंजरथ रोडवरील फातिमा नगर येथील पाण्याच्या टाकीचे बंद पडलेले काम सुरू करावे, शहरात स्वच्छता नसल्याने डेंगीसारखे आजार वाढत आहेत. त्यामुळे नाल्या स्वच्छ कराव्यात.

आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग एक ते बारामध्ये डीडीटी फवारणी करावी. मुख्य रस्त्यावरील मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. यातून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. आझाद नगर, गौतम नगर, कचारवाडा, रहमत नगर, कुरेशी गल्ली, पॉवरहाउस रोड, बिलाल मोहल्ला याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या नोंदी मालकी हक्कात घ्या यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात दयानंद स्वामी, नारायण डक, कचरू खळगे, डॉ. सरवदे, शकील कुरेशी, मनोज फरके, नुमान चाउस, टी. आर. जावळे, अनिल साळवे, राम भोले, राणा कुरेशी, फेरोज कुरेशी आदी सहभागी झाले होते. आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी पालिकेच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे यांनी माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांना पत्र दिले.यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation: दिल्लीत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; महिला आरक्षण आणि फेररचना विधेयके अधिवेशनात मंजूर होणार, अमित शहांच्या भेटीनंतर मोठे विधान

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Latest Marathi News Live Update : युनियन जिमखाना क्लबमध्ये गोळीबार; पूर्ववैमनस्यातून जालगारवर हल्ला, कॅम्प ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT