Satara News : मानाच्‍या गणपतींचे विसर्जन क्रमांक निश्चित

सर्वमान्‍य निघाला तोडगा; पोलिस, नगरपालिका, मंडळांच्‍या प्रतिनिधींची बैठक
satara
satara sakal

सातारा - सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मानाच्‍या गणपतींच्‍या विसर्जनावरून सुरू असणाऱ्या क्रमांकाच्‍या वादावर आज शाहूपुरी पोलिस ठाण्‍यातील बैठकीत तोडगा काढण्‍यात आला. या बैठकीत झालेल्‍या चर्चेनुसार मानाच्‍या गणेश मंडळांनी विसर्जनासाठीच्‍या रांगेतील आपले क्रमांक ठरवत त्‍याबाबतचे लेखी पोलिसांना दिले.

सातारा शहरातील गणेशोत्‍सवास ऐतिहासिक परंपरा असून, अनेक मंडळांना त्‍यात मानाचे स्‍थान आहे. मानाचे स्‍थान असणाऱ्या गणपती मंडळात विसर्जनादरम्‍यान सर्वात शेवटचा मान असणारी पाच मंडळे आहेत. या मंडळांतील विसंवादामुळे विसर्जन क्रमांकावरून गोंधळ निर्माण होत होता. या गोंधळामुळे अनेक वेळा विसर्जनाची मिरवणूक रेंगाळून त्‍याचा ताण पोलिसांसह इतर यंत्रणांवर असे. हा ताण यंदा कमी व्‍हावा, तसेच मानाच्‍या गणेश मंडळांचे विसर्जन मिरवणुकीतील क्रमांक निश्‍चित व्‍हावे,

यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पुढाकार घेतला. यासाठी त्‍यांनी शनिवार चौकातील जयहिंद व्‍यायाम मंडळ, सोमवार पेठेतील आझाद हिंद गणेशोत्‍सव मंडळ, गुरुवार पेठेतील गुरुवार तालीम गणेशोत्‍सव मंडळ, बुधवार पेठेतील अजिंक्‍य गणेशोत्‍सव मंडळ, शनिवार पेठेतील जयजवान गणेशोत्‍सव मंडळाच्‍या पदाधिकाऱ्यांना तसेच सातारा शहर पोलिस ठाण्‍याचे वरिष्‍ठ अधिकारी व पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांच्‍या संयुक्‍त बैठकीचे आयोजन सोमवारी केले होते.

या बैठकीत चर्चा झाली व त्‍यातून उपस्‍थित मंडळांनी विसर्जन मिरवणुकीतील आपला क्रमांक ठरवत त्‍याबाबतचे लेखी पोलिसांना दिले. यानुसार विसर्जन मिरवणुकीत सर्वात शेवटच्‍या एक क्रमांकास जयहिंद व्‍यायाम मंडळ, दुसऱ्या क्रमांकास आझाद हिंद गणेशोत्‍सव मंडळ, तिसऱ्या क्रमांकास गुरुवार तालीम गणेशोत्‍सव मंडळ, चौथ्‍या क्रमांकास अजिंक्‍य गणेशोत्‍सव मंडळ आणि पाचव्‍या क्रमांकास जयजवान गणेशोत्‍सव मंडळ राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीत या पाच मानाच्‍या गणपतींचे क्रमांकानुसार विसर्जन झाल्‍यानंतर शनिवार पेठेतील मानाच्‍या शंकरपार्वती गणपतीचे विसर्जन होऊन मिरवणुकीची सांगता होणार आहे.

satara
Satara News : पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर कराडला मुस्लिम समाजाची पोलिसांसमवेत बैठक; संशयीतावर कारवाईची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com