beed beed
मराठवाडा

भीक मागणाऱ्याचे पावणेदोन लाख चोरीला! पोलिसांचा तासाभरात तपास

वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे भीक मागून जगत आहेत

प्रविण फुटके

परळी (बीड): शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागणाऱ्या एका वयोवृद्ध नागरिकाने जमा केलेली पुंजी सोमवारी (ता.२४) रात्री हरवली. त्यांनी येथील पोलिसांना मंगळवारी कळवले, गुप्त विभागाने चक्रे फिरवून मंगळवारी (ता.२५) अवघ्या तीन तासात १ लाख ७२ हजार २९० रुपये शोधून काढले. व त्या वयोवृद्ध व्यक्तीला परत दिले.

येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे (वय ८०) हे घरची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याने भीक मागून जगत असत. बाबूराव नाईकवाडे यांनी भीक मागून पै-पै जमा केली. परिवारात एक मुलगा, सुन असूनही त्यांचा सांभाळ करत नव्हते. म्हणून इकडून-तिकडून कसेतरी आपले जीवन भागवू लागले. जमा केलेले पैसे एका पिशवीत भरून जवळच ठेवले होते. पण सोमवारी सायंकाळी त्यांच्या लक्षात आले की, आपली पिशवी हरवली आहे.

नाईकवाडेंनी मंगळवारी सकाळी पोलिसांना सांगितले की, माझे २ लाख रुपये हरवले आहेत. पोलिसांना काही विश्वास बसत नव्हता. पण येथील गुप्तचर विभागाने यंत्रणा हलवत हा व्यक्ती कुठे जात होता, कुठे बसत होता, कुठे झोपत होता त्याठिकाणी जावून चौकशी केली. अवघ्या तीन तासांत या प्रकरणाचा छडा लावला व बाबूराव नाईकवाडे यांचे तब्बल १ लाख ७२ हजार २९० रूपये एका पिशवीत सापडले. पोलिसांनी फोन करून नाईकवाडेंना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले आणि पैसे स्वाधीन केले.

यावेळी बाबूराव यांना पैसे पाहताच अश्रू अनावर झाले होते. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्ष पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, शंकर बुड्डे, मधुकर निर्मळ सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT