तडका महागला! खाद्यतेलाच्या भावात दिवसेंदिवस वाढच

महागाईने सर्वसामान्य हैराण, टाळेबंदीमुळे किराणा मालाचे दरही वाढले
edible oil
edible oiledible oil

माजलगाव (बीड): मार्च महिन्यापासून कोरोनाचे (covid 19) रूग्ण वाढत असल्याने टप्प्या-टप्प्याने प्रशासनाने लॉकडाउन (lockdown in beed) केले मात्र महागाई लॉकडाउन करण्यास शासन असमर्थ ठरत आहे. जीवनावश्यक आणि रोज लागणारे खाद्यतेल १७० (edible oil) रुपये प्रतिकिलो झाले तर इतर किराणा मालास देखील महागाईचा तडका लागल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

मागील वर्षांपासून आलेल्या कोरोनामुळे सर्वांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षण, शेती, उद्योग वा व्यवसायासह सर्वच क्षेत्रांचे कोरोनामुळे आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत टाळेबंदीत अनेकजण भाववाढ करून माल विक्री करीत आहेत. तर मागील आठ ते दहा दिवसांपूर्वीच १६० रुपये प्रतिकिलो मिळणारे खाद्यतेल आज १७० रुपयांवर गेले आहे. काही दिवसांतच एवढी भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांचे दिवाळे निघत आहे. त्याचबरोबर शेंगदाणा १०७ रुपये किलो झाला आहेत. टाळेबंदीमुळे अनेकांच्य हातचा रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत खाद्यतेलाचे दर वाढले असून किराणा माला देखिल अधिकचे पैसे देऊन खरेदी करावा लागत आहे. शेंगदाणा तेल २३०, करडई २३०, विना पॅकिंग तेल १६० रूपये प्रति किलो झाले आहे.

edible oil
Beed Lockdown| बीडमध्ये ३१ मे पर्यंत कडक लॉकडाउन वाढवला

टाळेबंदीमुळे ५०० रुपयांमध्ये येत असलेल्या किराणा साहित्यास सध्या ८०० ते ९०० रुपये मोजावे लागत आहेत. घरात येणाऱ्या पगारापेक्षा खर्च अधिक होत असल्याने किचनचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

- अर्चना काळे, गृहिणी

मागील दहा दिवसांपूर्वीच १६० रुपये किलो तेल खरेदी केले होते परंतु आता १७० रुपये भाव झाला आहे. तर इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखिल वाढतेच आहेत. त्यामुळे आर्थिक चणचण भासत आहे. शासनाने महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले परंतु महागाई वाढतीच आहे.

- सविता रूद्रवार, गृहिणी.

टाळेबंदी असल्याने ठोक माल मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्वत्र दरवाढ होत आहे. तर खाद्यतेल, शेंगदाण्याचे दर कमी जास्त होत आहेत.

- गणेश लोहिया, विक्रेते, माजलगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com