Uddhav Thackrey  Esakal
मराठवाडा

Uddhav Thackrey: बीडमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार! ४० वर्षापासून शिवसेनेसोबत निष्ठावंत असलेल्या नेत्यांने सोडली साथ

Uddhav Thackrey: ४० वर्षापासून शिवसेनेसोबत निष्ठावंत असलेले माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या (१० जानेवारी) लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ४ वाजता निकाल जाहीर करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कुणाचे आमदार अपात्र होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच ठाकरे गटाला बीडमध्ये मोठं खिंडार पडलं आहे.

४० वर्षापासून शिवसेना ठाकरे गटासोबत निष्ठावंत असलेले माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. आज (मंगळवारी) ते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी अनिल जगताप हे हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

जगताप यांनी मुंबईला जाण्यापुर्वी बीडमध्ये शक्तीप्रदर्शन केलं आहे. जवळपास ५०० गाड्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. अनिल जगताप यांचे बीडमध्ये मोठं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

आता ते ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याने उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सुषमा अंधारे यांच्या त्रासाला कंटाळून आपण पक्षप्रवेश करत असल्याचं जगताप यांनी जाहीर केलं आहे. आगामी निवडणुकांमध्येही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Shrigonda Drowning: पोहताना वडिलाचा मृत्यू,९ वर्षीय मुलगा बचावला; श्रीगोंदे तालुक्यातील घटना, युवकाने जीव धाेक्यात घातला,थरारक घटना!

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

SCROLL FOR NEXT