'शिंदे-फडणवीस-पवारांचं सरकार गतिमान, धैर्यशील मानेंना पुन्हा एकदा खासदार करा'; श्रीकांत शिंदेंचं नागरिकांना आवाहन

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार गतिमान असून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे.
Ichalkaranji Shrikant Shinde Dhairyasheel Mane
Ichalkaranji Shrikant Shinde Dhairyasheel Maneesakal
Summary

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली.

इचलकरंजी : ‘शासनाच्या विविध लाभाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम गतीने करावे. या माध्यमातून धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी पक्षाची बांधणी भक्कम करुया’, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी केले.

Ichalkaranji Shrikant Shinde Dhairyasheel Mane
Konkan Politics : कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार दळवी करणार भाजपमध्ये प्रवेश?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangle LokSabha Constituency) विधानसभानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी संवाद साधला. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदारसंघनिहाय पक्ष कार्याची सविस्तर माहिती घेतली.

ते म्हणाले,‘ राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार गतिमान असून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. ’ यावेळी काही मुद्यांवर त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानपिचक्याही दिल्या. सक्रीय शिवसैनिकांना भक्कम पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Ichalkaranji Shrikant Shinde Dhairyasheel Mane
Loksabha Election : '2009 च्या निवडणुकीत झालेली जखम मी अजून विसरलेलो नाही'; संभाजीराजेंचं कोणाला उद्देशून वक्तव्य?

दरम्यान, संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खासदार शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ठाकरे गटाच्या युवती सेनाप्रमुख सलोनी शिंत्रे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी भाऊसाहेब चौधरी, योगेश जानकर, नरेश मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, आनंदराव पोवार, अविनाश बनगे, अनिल सुतार, सतिश मलमे, संतोष जाधव, रवि लोहार आदी उपस्थित होते.

सुळकूड योजनेचा प्रश्न मुख्यमंत्री मार्गी लावतील

‘राज्यातील अनेक रखडलेले पाणी प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावले आहेत. त्याच पध्दतीने इचलकरंजी शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या सुळकूड पाणी योजनेचा प्रश्नही ते निश्चितपणे मार्गी लावतील, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Ichalkaranji Shrikant Shinde Dhairyasheel Mane
खासदार उदयनराजेंनी घेतली काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्‍यक्षांची भेट; राजकीय चर्चांना उधाण, भेटीत काय घडलं?

जल्लोषी स्वागत

खासदार शिंदे हे प्रथमच इचलकरंजी दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. कोल्हापूर नाका येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. तर सर्वच कार्यक्रमांच्या ठिकाणी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. पक्षाच्यावतीने प्रमुख चौकांसह रॅली मार्गावर पक्षाचे ध्वज लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com