Gutkha two vehicles and Rs 70 lakh seized sakal
मराठवाडा

गुटखा, दोन वाहनांसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात गस्ती

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद - स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यात केलेल्या कारवाईत गुटखा, दोन वाहनांसह ६९ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात गस्तीवर गेले होते.

या दरम्यान, बुधवारी (ता.२२) ते कोंड (ता. उस्मानाबाद) येथे गेले. तेथील महालिंग नागू कोरे यांनी कोंड शिवारातील आपल्या शेतातील गोदामात गुटख्याचा साठा केल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने छापा टाकला असता गोदामासमोर आयशर टेंपो, पिकअप या वाहनांत ५२ लाख ९२ हजारांचा गुटखा आढळला.

पथकाने गुटखा, दोन्ही वाहनांसह ६९ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून संशयित महालिंग नागू कोरे यांच्याविरुद्ध ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, हेडकॉन्स्टेबल अमोल निंबाळकर, जावेद काझी, प्रकाश औताडे, विनोद जानराव, धनंजय कवडे आदींनी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Cut : पुण्यात सोमवारपासून पाणी कपात; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Pune News : शहरात १५ जूनपासून जड वाहनांना प्रवेश बंदी

FDA Action in Pune: अन्न व औषध प्रशासन विभागाची पुण्यात आणखी एक कारवाई; साडेचार लाख रुपयांचा माल जप्त

Pune Accident : येरवडा, लोणी काळभोरमधील अपघातांत दोन ज्येष्ठांचा मृत्यू

Pune Water Cut schedule : पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT