Hingoli  Sakal
मराठवाडा

Hingoli : ट्रॅव्हल बसवर दगडफेक; मात्र सुदैवाने बस मधील तीस ते चाळीस प्रवासी सुखरूप

या घटनेमुळे वाळूज परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाश्यांमध्ये मोठी खळबळ उडाली

सकाळ वृत्तसेवा

वाळूज महानगर - पुण्याकडून वाळूज, छत्रपती संभाजीनगर मार्गे हिंगोलीकडे जाणाऱ्या एका खाजगी बसवर अज्ञात आरोपींनी दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने बस मधील तीस ते चाळीस प्रवासी सुखरूप आहेत.

शनिवारी (ता.29) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास झालेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हिंगोली येथील एका खाजगी बस (एम एच 38, एफ -2099) (खुराणा ट्रॅव्हल्स) पुण्यावरून वाळुज, छत्रपती संभाजीनगर मार्गे हिंगोलीकडे जात असताना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथे शनिवारी (ता.29) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करून हल्ला केला.

या हल्ल्यात खुराणा ट्रॅव्हल बसच्या समोरील काचा फुटल्याने बस मधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. या ट्रॅव्हल्स मध्ये 30 ते 40 प्रवासी असल्याचे सांगितल्या जाते. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

वाळूज परिसरातील जिकठाण शिवारात दोन दुचाकी स्वारांना लुटल्यानंतर खाजगी ट्रॅव्हल बसवर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याच्या या घटनेमुळे वाळूज परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाश्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT