शेतातून वाहणाऱ्या नदीपात्रातच ‘चमकुरा’ भाजीपाल्याची लागवड चिकाळा (ता. हदगाव) येथील एका बेरोजगार तरुणाने केली आहे. 
मराठवाडा

अशी केली तरुणाने ओढ्यामध्ये ‘चमकुरा’ लागवड

सकाळ वृत्तसेवा

घोगरी ः शेतातून वाहनाऱ्या नदीपात्रातच (ओढा) ‘चमकुरा’ या भाजीपाल्याची यशस्वी लागवड करून चिकाळा (ता. हदगाव) येथील एका बेरोजगार तरुणाने ‘प्रगती’चा मळा फुलविला आहे. या बिनभांडवली भाजी शेतीतून त्याला चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे चित्र आहे. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनाही घरीच रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
चिकाळा येथील शेतकरी सदाशिव सोनटक्के हे आदिवासी समाजाचे व उच्चशिक्षित आहेत. शिवाय त्यांची जमीन ही लघू तलावात जाण्याने त्यांनी शासकीय नोकरीसाठी बरेच प्रयत्न चालवले. परंतु, त्यांना सतत अपयश येत असल्याने त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. 

बाजारात या चमकुऱ्यास मोठी मागणी
अल्प शेती असल्याने या शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनातून कुटुंबीयांचा घरखर्च भागविणे कठीण जाऊ लागल्याने या तरुणाने एक नामी शक्कल लढवून आपल्याच शेतातून वाहनाऱ्या नदीच्या पात्रात (ओढा) ‘चमकुरा’ या पालेभाज्यांची यशस्वीपणे लागवड करून आर्थिक उत्पादनाचे साधन निर्माण केले. गोड्या पाण्यातच (चिखल) पण स्वच्छ पाण्यात या ‘चमकुऱ्याची’ शेतकऱ्याने लागवड केली. बाजारात या चमकुऱ्यास मोठी मागणी होताना दिसत आहे. यामुळे त्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ लागला आहे.

बिनभांडवली व्यवसायातून उत्पन्न
हा व्यवसाय बिनभांडवली असल्याने शिवाय या पालेभाज्यावर कुठल्याही कीटकनाशकाचा व रासायनिक खताचा वापर होत नसल्याने आरोग्याच्या दृष्टीने ‘चमकुरा’ या पालेभाज्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. पोट विकार मुतखडा, यासाठी ही भाजी उपयुक्त असल्याने बाजारात भाजीला खूप मागणी आहे. ही ‘चमकुरा’ केवळ गोड्या पाण्यात येत असल्याने व शेती लगतच लघू तलाव असल्याने बारमाही या ओढ्याला मुबलक पाणी दिसून येते. यामुळे येथील भाजीशेती बारमाही आलेली दिसून येते.

शेळीपालन, गोपालनाचा छंद जोपासला
संपूर्ण कुटुंब हे शेतीतच राहत असल्यामुळे, शिवाय जवळच घनदाट जंगल असल्याने पालेभाज्याबरोबरच शेतीपूरक जोडधंदा म्हणून शेळीपालन, गोपालन हा छंद या बेरोजगार तरुणाने जोपासून घरीच रोजगाराचे साधन उपलब्ध करून घेतले आहे. जिद्द, चिकाटी, मेहनतीने हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास कोणतेही काम अवघड नाही, हे यावरून दिसून येते. एकंदरीत कोणत्याही कामात अपयश येत असल्याने हताश नव्हता नव्या उमेदीने प्रयत्न केल्यास रोजगाराचे साधन करता येते, हे पाहावयास मिळत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT