तुळजापूर (जि.उस्मानाबाद) - आयसीआयसीआय बॅकेची फसवणूक केल्या प्रकरणी चौघा जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. 
मराठवाडा

तुळजापुरात आयसीआयसीआय बँकेची फसवणूक, ६३ तोळे बनावट सोने तारण

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : येथील आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) 63 तोळे बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी (ता.14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, सद्दाम शेख यास मोहोळ (जिल्हा सोलापूर) येथून अटक करण्यात आली आहे. तसेच रसिद अल्लाउद्दीन नदाफ राहणार अरबळी (ता.तुळजापूर) आणि (Osmanabad) कोंडाजी हारूण खुदादे (रा.इटकळ ता.तुळजापूर) (Tuljapur) तसेच अब्बास राजू पठाण (रा. इटकळ ता.तुळजापूर) यास मंगळवारी अटक करण्यात आली आहे. 1 लाख 35 हजार 100 रूपये जप्त करण्यात आले असून बँँकेत 3 लाख 21 हजार 556 रूपये संशयित आरोपींनी बँकेत भरणा केला आहे.

या संदर्भात बॅंकेचे व्यवस्थापक सुनील क्षीरसागर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजूम शेख, पोलिस निरीक्षक आदिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ज्ञानेश्वर कांबळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! समलिंगी संबंध ठेवण्यास विद्यार्थिनीचा नकार; आत्यानं रुद्राक्षाच्या माळांनी गळा दाबून संपवलं

Latest Marathi news Update : शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच रायगडमधील राजकारणावर मोठ वक्तव्य

Bank Closed : सलग चार दिवस बँका बंद! 27 जानेवारीला बँकिंग सेवा का बंद राहणार? बँकेत जाण्याआधी जाणून घ्या कारण

Tharal Tar Mag : सायली-अर्जुनच्या सापळ्यात अलगद सापडला नागराज ! सुमनसमोर कबूल केलं सत्य; "आता तन्वी.."

Shivaji Maharaj Brother : छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावाचा इतिहास माहितीये का? वडिलांचे लाडके पण दगाफटका करून क्रूरपणे हत्या

SCROLL FOR NEXT