esakal | सुखद! मराठवाड्यातील मोठी चार धरणे भरली शंभर टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

धरण शंभर टक्के भरले

सुखद! मराठवाड्यातील मोठी चार धरणे भरली शंभर टक्के

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्याच्या मोठ्या धरणांपैकी येलदरी(Yeldari), सिद्धेश्‍वर (Siddheshwar), विष्णुपुरी (Vishnupuri) आणि मानार (Manar) ही चार धरणे शंभर टक्के भरली (Dams In Marathwada) आहेत. तसेच मांजरा, माजलगाव, पैनगंगा आणि निम्न दुधना प्रकल्पाची शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) साठा ६० टक्क्यांच्या पुढे गेला आहे, मात्र हा साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्यावर्षी याच तारखेला या धरणात ९८.२४ टक्के पाणीसाठा होता तो यंदा ६०.५८ टक्के इतका आहे.

हेही वाचा: नांदेडमध्ये पाच जण कोरोनाबाधित, ३३ रुग्णांवर उपचार सुरु

मराठवाड्याची जीवनवाहिनी गोदावरीवरील जायकवाडी धरणात मंगळवार (ता.१४) पर्यंत १३१५.३६ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणी साठा असून हे प्रमाण ६०.५८ टक्के इतके आहे. गेल्यावर्षी याच तारखेला ९८.२४ टक्के एवढा पाणीसाठा कमी आहे. हा साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत ३७.६६ टक्के कमी आहे. येलदरी, सिद्धेश्‍वर, मानार आणि विष्णुपुरी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. यामध्ये येलदरीत ८०९.७७ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा, सिद्धेश्‍वरमध्ये ८०.९६ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणी साठा, मानारमध्ये १३८.२१ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणी साठा आणि विष्णुपुरीत ८०.७९ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणी साठा आहे.

हेही वाचा: जालना जिल्ह्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, आईची पोलिसांकडे तक्रार

निम्न दुधनामध्ये २३५४.७७ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणी साठा, माजलगाव धरणात २३.६० दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणी साठा, मांजरा धरणात १६२.७० दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणी साठा, पेनगंगा धरणात ९५०.७१ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणी साठा, मानारमध्ये १३८.२१, निम्न तेरणात ६६.३४ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणी साठा, सीना कोळेगाव धरणात २६.८१ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणी साठा सध्या आहे. सर्वांत कमी सीना कोळेगाव धरणात पाणीसाठा आहे. येलदरी, सिद्धेश्‍वर, माजलगाव, पेनगंगा, मानार आणि विष्णुपुरी या सहा धरणांच्या सांडव्यातून पाणी सोडले जात असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.


धरणसाठा (टक्केवारी)
.....
धरणाचे नाव ........१४ सप्टेंबर २०२१.........१४ सप्टेंबर २०२०
.........................................................…
० जायकवाडी : ........६०.५८...................९८.२४
० निम्न दुधना : .......९६ . ९३...................७७.१३
० येलदरी : ..........१००. ०९..................१००.१०
० सिद्धेश्‍वर :..........१००........................९७ ५९
० माजलगाव : .......९४.१०......................९०. ९६
० मांजरा : ............९१.९४......................११.७८
० पेनगंगा : ..........९८.६........................९८. ५१
० मानार : ...........१००.........................८२.७१
० निम्न तेरणा : ......७२. ७२.....................२ . ३३
० विष्णुपुरी : ........१०० ........................९२.३०
० सीना कोळेगाव : ...३०.........................-७७.०६

loading image
go to top